आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

6499 रूपयांत Micromaxने लॉन्च केला Bolt A075

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फ्लॅगशिप स्मार्टफोन कॅनवास नाइट (Canvas Knight) लॉन्च करण्याआधीच मायक्रोमॅक्सने बोल्ट सिरीजचा नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. बोल्ट A075ची किंमत 6499 रूपये आहे. स्क्रीन साइजमध्ये हा मोबाइल गॅलेक्सी S5लाही टक्कर देतो. सॅमसंग गॅलेक्सीS5 ची स्क्रीन 5.1 इंच आहे तर मायक्रोमॅक्स बोल्ट A075ची स्क्रीन 5.2 इंच आहे.
अनेक दिवसांपासून मायक्रोमॅक्स सर्व मोबाइल ऑनलाइन लॉन्च करत आहे आता कंपनीने हा स्मार्टफोनही ऑनलाइनच लॉन्च केला आहे. HomeShop18 ऑनलाइन स्टोअरवर हा स्मार्टफोन दाखल झाला आहे. सध्या हा मोबाइल आउट ऑफ स्टॉक आहे. लो बजेट सिरीजमध्ये मायक्रोमॅक्सची बोल्ट सिरीज लोकप्रिय आहे. या सिरीजमध्ये 2500 ते 8000 रूपये किंमत असणा-या मोबाइलचा समावेश होतो. कंपनीने बोल्ट आणि कॅनवास सिरीजचे स्मार्टफोन्स रशियातही लॉन्च केले आहेत.
या स्मार्टफोनचे वैशिष्टे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...