आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मायक्रोमॅक्सचा Canvas Gold लॉन्च - 16 MP कॅमेरा, iPhoneसारखा लूक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: मायक्रोमॅक्स कॅनव्हास गोल्डचे दो कलर व्हेरियंट)

गॅजेट डेस्क - मायक्रोमॅक्सने आपला पहिला विंडोज फोन लॉन्च केल्यानंतर आता कंपनीने कैनवास गोल्ड A300 (ऑक्टा-कोर प्रोसेसर) हा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. हा फोन रिटेल वेबसाईट infibeam.com विक्रीसाठी उपलब्ध आहे. यामध्ये सर्वाच चांगली गोष्ट म्हणजे सध्या हा फोन स्टॉकमध्ये उपलब्ध आहे. या फोनसाठी तुम्हाला मोजावे लागतील केवळ 23,999 रुपये.

ऑक्टा कोर प्रोसेसर-
कॅनव्हास नाईटनंतर कॅनव्हास गोल्ड A300 हा कंपनीचा आतापर्यंतचा दुसरा ऑक्टा-कोर प्रोसेसर असलेला स्मार्टफोन आहे. या फोनची जमेची बाजू हे 2 GHz चे ऑक्टा-कोर प्रोसेसर बनू शकते.

आयफोनसारखा लूक-
सोनेरी रंगामध्ये या फोनची बॉडी असल्याकारणारे हा फोन आयफोनसारखा दिसतो. या फोनला पाहताच तुम्हाला आयफोन 5S ची नक्कीच आठवण येईल.

मागील आठवड्यात मायक्रोमॅक्सच्या या फोनची छायाचित्रे आणि स्पेसिफिकेशन लिक झाले होते, मात्र कंपनीने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. कदाचित कंपनी आपल्या विंडोज फोनच्या कामात व्यस्त असेल, परंतु ऑक्टा-कोर प्रोसेसर, सोनेरी रंग आणि आयफोनसारखा लुक असे फिचर्स असलेल्या या फोनबद्दल पाळलेली शांतता थोडे विचित्रंच वाटते. मायक्रोमॅक्सचा हा फोन आयफोनप्रमाणेच मुख्य सोनेरी रंगात येतो. यामध्ये दोन प्रकार आहेत. एक सोनेरी पांढरा (गोल्ड व्हाइट) आणि सोनेरी काळा (गोल्ड ब्लैक) यांचा समावेश आहे.

पुढील स्लाईडवर पहा... मायक्रोमॅक्सच्या या स्मार्टफोनचे इतर फिचर्स