आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Micromax ने लाँच केला Canvas Magnusस्मार्टफोन, किंमत 15 हजारांपेक्षाही कमी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - मायक्रोमॅक्स कॅन्व्हास मॅग्नस भारतात लाँच झाला आहे. ऑनलाइन शॉपिंग साइट्सवर 15 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत याची विक्री गेल्या महिन्यातच सुरु झाली होती.
मायक्रोमॅक्सच्या कॅन्व्हास सिरीजमध्ये मॅग्नसने भर घातली आहे. याआधी मॅक्रोमॅक्सने कॅन्व्हास सिरीमध्ये कॅन्व्हास 2, कॅन्व्हास एचडी, कॅन्व्हास 4, कॅन्व्हास 3डी आणि कॅन्व्हास डुडल 2 यासारखे स्मार्टफोन आणि फॅब्लेट लॉन्च केले आहेत.
नुकत्याच सादर केल्या गेलेल्या कॅन्व्हास मॅग्नस ए117 मध्ये 720X1280 पिक्सल रेझुलुशनमध्ये 5 इंचाचा आयपीएस डिस्प्ले आहे. 1.5. गीगाहर्टझ् क्वॉड कोर प्रोसेसर आणि 1 जीबी रॅम आहे. हा मोबाईल अँड्रॉइड 4.2 जेलिबीनने संचलित होतो. याला 12 मेगापिक्सल कॅमेरा असून एलइडी फ्लॅश आहे. यावर फुल एचडी रेकॉर्डिंग करता येते.
या मोबाइलची आणखी छायाचित्रे पाहाण्यासाठी स्लाइडवर क्लिक करा.