आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Micromax Canvas Selfie Announced With 13 MP Front Camera

१३ मेगापिक्सलच्या फ्रन्ट कॅमेऱ्यासोबत लॉन्च झाला Micromax Selfie

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅजेट डेस्कः मायक्रोमॅक्सने आपला लो बजेट कॅनव्हास बजेट लॉन्च केल्यानंतर आता कंपनीने कॅनव्हास सेल्फी स्मार्टफोन लॉन्च केला आहे. मायक्रोमॅक्सच्या सेल्फीची विक्री जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून ऑनलाईन आणि ऑफलाईन स्टोअरवर सुरू होईल. याच्या किंमतीबद्दल सध्यातरी कंपनीने कोणतीच माहिती दिलेली नाही.

13 मेगापिक्सलचा फ्रन्ट कॅमेरा-
या फोनमध्ये सर्वात चांगली गोष्ट आहे ती म्हणजे याचा फ्रन्ट कॅमेरा. मायक्रोमॅक्सने HTC डिजायर आयच्या पावलावर पाऊल टाकत फ्रंट आणि बॅक अशा दोन्ही ठिकाणी 13 मेगापिक्सलचा ऑटोफोकस कॅमेरा दिला आहे. यासोबतच फ्रंट आणि बॅक दोन्ही कॅमेऱ्याला फ्लॅशची सुविधा देण्यात आली आह. नव्या कॅनव्हास सेल्फीमध्ये सोनी सेंसरचा वापर करण्यात आला आहे. कॅनव्हास सिरीजच्या या नव्या स्मार्टफोनमध्ये लेदर फिनिशचे बॅक कव्हर देण्यात आले आहे.
पुढील स्लाईडवर पाहा, या फोनचे फीचर्स -