आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Micromax Company Launches Low Budget Feature Phone News In Marathi

MICROMAX ने लॉन्च केले JOY SERIES मधील Low Budget फीचर फोन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: Micromax X1800 (L) And X1850)
'Micromax'ने 'Samsung' पछाडत भारतीय बाजारपेठेत उंच उडी घेत पहिले स्थान पडकावले आहे. Micromaxचे मनोबल चांगलेच उंचावले असून शुक्रवारी आपल्या नव्या जॉय (JOY) ‍सीरिजमधील दोन न्यू फीचर फोन लॉन्च केले. JOY X1800 आणि JOY X1850 अशी ही दोन मॉडेल आहे.
स्वस्त आणि मस्त...
Micromax ने लॉन्च केलेले दोन्ही फोन स्वस्त आणि मस्त आहे. नव्या फीचर फोनची किंमत सगळ्यात कमी असल्याचा दावा कंपनीने केला आहे. JOY X1800 ची किंमत 699 रुपये असून JOY X1850 ची किंमत 799 रुपये आहे.
JOY X1800 ची विक्री येत्या गुरुवारपासून सुरु होणार आहे. मात्र, JOY X1850 साठी काही दिवस प्रतिक्षा करावी लागणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

नव्या पॅकेजिंगचा प्रयोग...
Micromax ने JOY ‍सीरिसमधील फीचर फोन नव्या पॅकजिंगमध्ये सादर केले जाणार आहेत. फोन बॉक्समध्ये नव्हे तर पाऊचमध्ये येणार आहे. कॅण्डी पाऊचसारखे हे पाऊच आहेत.
Micromax ने ग्रामीण भागातील लोकांना केंद्रीत करून JOY ‍सीरिजमधील फोन लॉन्च केले असल्याचे कंपनीचे सीईओ विनीत तनेजा यांनी म्हटले आहे. फोन इनोवेटिव्ह पॅकेजिंगसोबत येणार असल्याने त स्वस्त आहेत.
दरम्यान, Micromax ने यापूर्वी आपली X आणि C सीरीजमधील फोन लॉन्च केले होते.
पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून जाणून घ्या, JOY X1800 आणि JOY X1850 मधील फीचर्स...