मायक्रोमॅक्सने लेटेस्ट फ्लॅगशिप स्मार्टफोन कॅनवास नाइट ऑक्टो- कोर चिपसह लॉन्च केला आहे. गेल्या काही दिवसांपासून मायक्रोमॅक्स इंटरनेटवर या मोबाइलच्या टिजर व्हिडीओ पोस्ट करत होते. मायक्रोमॅक्सचा हा नवीन स्मार्टफोन गॅलेक्सी S5ला टक्कर देईल हे निश्चित आहे. गॅलेक्सीS5 प्रमाणेच मायक्रोमॅक्स कॅनवास नाइटमध्येही 16 मेगापिक्सल कॅमेरा आहे. याचबरोबर हा स्मार्टफोन एक्सपिरिया Z2, HTC One 2 M8
नोकिया आणि मोटोरोलाच्या लेटेस्ट अॅन्ड्राइड मोबाइल्सना टक्कर देईल.
ऑक्टा-कोर असणारा पहिला मोबाइल
कॅनवासच्या टिझर अॅडमध्ये 'The power of Eight' ही कंपनीची टॅगलाइन होती. यानूसार हा स्मार्टफोन ऑक्टा कोर प्रोसेसरवर आधारित असणार हे निश्चित झाले होते. मायक्रोमॅक्सचा हा पहिलाच ऑक्टा- कोर प्रोसेसर असणारा स्मार्टफोन आहे.
या स्मार्टफोनचे फिचर्स जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...