आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मायक्रोमॅक्‍सचा नवा टॅबलेट 'फनबुक-प्रो' सादर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- भारतीय हॅण्‍डसेट उत्‍पादक कंपनी मायक्रोमॅक्‍सने आज 10.1 इंच रुंद स्क्रिनचा अद्ययावत टॅबलेट सादर केला. मोठी स्क्रिन तसेच ऍण्ड्रॉइड आईस्क्रीम सँडविच 4.0 ही सर्वाधिक अद्ययावत ऑपरेटींग सिस्टीम हे या टॅबलेटचे वैशिष्‍ट्य आहे. 'फनबुक प्रो' असे या नव्‍या टॅबलेटचे नाव आहे. या श्रेणीतील टॅबलेटची किंमत 9,999 रुपये आहे.
मायक्रोमॅक्‍सने यापूर्वी 7 इंच रुंद स्क्रिनचा 'फनबुक' टॅबलेट सादर केला होता. या टॅबलेटची किंमत 6,499 रुपये एवढी आहे. ग्राहकांना आणखी एक पर्याय मिळावा, यासाठी नवा टॅबलेट सादर केला, कंपनीचे सीईओ दिपक मलहोत्रा यांनी सांगितले. 'फनबुक'ला चांगला प्रतिसाद मिळाला असून आतापर्यंत 1.4 लाख टॅबलेट विकल्‍या गेले. नव्‍या टॅबलेटलाही असाच प्रतिसाद मिळेल, असे मलहोत्रा यांनी सांगितले. 'फनबुक प्रो'मध्‍ये 1.2 गिगाहर्ट्झ प्रोसेसर, 0.3 मेगापिक्‍सेल कॅमेरा, 8 जीबी अंतर्गत मेमरी इत्‍यादी वैशिष्‍टे असून मेमरी क्षमता 32 जीबीपर्यंत वाढविता येऊ शकते. मल्टी टचस्क्रीन असलेल्या या टॅब्लेटमध्ये 1080 पिक्सेल क्षमतेचा हाय डेफिनिशन व्हिडिओ प्लेबॅक असल्यामुळे, सुस्पष्ट व्हिडिओ पाहण्याचा आनंद घेता येणार आहे.
टॅबलेटच्या मांदियाळीत ‘आइस एक्स एक्स्ट्रीम’ अवतरला
मायक्रोसॉफ्टने आणला \'विंडोज-8\'वर चालणारा टॅबलेट