आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मायक्रोमॅक्सचा नवा टॅब्लेट लाँच

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- भारतीय मोबाइल हँडसेट निर्माता मायक्रोमॅक्सने आपला 10 इंच आकार असलेला टॅब्लेट पीसी सादर केला आहे. हा टॅब्लेट 4.0 अँड्राइड ऑपरेटिंग सिस्टिमयुक्त आहे. यात 1.2 गीगाहर्ट्झ कोर्टेक्स ए-8 हा प्रोसेसर लावण्यात आला आहे. बॅटरी बॅकअपसाठी टॅब्लेटमध्ये 5600 एमएचची बॅटरी वापरण्यात आली आहे. टॅब्लेटची किंमत 9,900 रुपये आहे. कंपनीने भारतीय बाजारपेठेत आपले दोन सुपरफोन ए-90 व कॅन्व्हॉस ए-100 देखील सादर केले आहेत. हे दोन्ही फोन अँड्राइडच्या लेटेस्ट ऑपरेटिंग सिस्टिमने सज्ज आहेत.
-90मध्ये 800 बाय 480 पिक्सेलयुक्त 4.3 इंचांची टच स्क्रीन देण्यात आली आहे. याशिवाय फोनमध्ये 1 गीगाहर्ट्झचा प्रोसेसर व 8 मेगापिक्सेलचा कॅमेरीही देण्यात आला आहे. याची किंमत 12,990 राहील.
- कॅन्व्हॉस ए-100 मध्ये 1 गीगाहर्ट्झचा ड्युअल कोअर प्रोसेसर, 5 मेगापिक्सेलचा कॅमेरा व पाच इंचांची स्क्रीन ही वैशिष्ट्ये आहेत. ए-90 व कॅन्व्हासची किंमत 9,900 इतकी ठेवण्यात आली आहे.