आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तीस लाख रुपयांची लाच देताना ‘मायक्रोमॅक्स मोबाइल’चे मालक जेरबंद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - मायक्रोमॅक्स मोबाइल कंपनीच्या दोन मालकांना 30 लाख रुपयांची लाच देताना सीबीआयने बुधवारी रंगेहाथ पकडले. दिल्लीतील बँक्वेट हॉलच्या कामाला परवानगी मिळावी म्हणून उत्तर दिल्ली महानगरपालिकेच्या अभियंत्यांना लाच देण्यात येत होती.

मायक्रोमॅक्स इन्फॉर्मेटिक्स कंपनीचे मालक राजेश अग्रवाल व मनीष तुली यांच्यासह महापालिकेच्या दोन कनिष्ठ अभियंत्यांना अटक झाली आहे. तसेच महापालिका अधिकार्‍यांची निवासस्थाने व कार्यालयांसह 15 ठिकाणी सीबीआयने धाडी घातल्या. दिल्लीतील वजीरपूर भागात बँक्वेट हॉलच्या बांधकाम परवानगीसाठी अग्रवाल आणि तुली यांच्याकडे महापालिका अभियंत्यांनी 50 लाखांची लाच मागितली होती. मात्र वाटाघाटीनंतर ते 30 लाखांवर सौदा झाला. तिमारपूर येथील कार्यालयात लाचेची रक्कम देण्यात येणार असल्याची माहिती मिळताच सीबीआयने धाड टाकून चौघांना रंगेहाथ पकडले. कनिष्ठ अभियंत्याच्या घरातून 40 लाखांची रोकड जप्त करण्यात आली.