Home | Business | Gadget | micromax-x102-dual-sim-low-cost-phone-features-and-price

फक्‍त 1094 रूपयात 'ड्युल' सिम, कॅमेरा आणि ब्‍लूटूथ मोबाईल

बिझनेस ब्‍युरो | Update - Apr 11, 2012, 01:04 PM IST

इतकंच नव्‍हेतर यामध्‍ये व्‍हीजीए कॅमेरासुद्धा आहे. ज्‍याचा उपयोग व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्‍यासाठी करता येऊ शकतो. या मोबाईलला एक वर्षाची वॉरंटी देखील आहे.

  • micromax-x102-dual-sim-low-cost-phone-features-and-price

    मोबाईल क्षेत्रातील अग्रणी कंपनी मायक्रोमॅक्‍सने बाजारात एक नवा आणि स्‍वस्‍त मोबाईल आणून कमालच केली आहे. त्‍यांनी सर्वात कमी किंमतीचा एक्‍स 102 मोबाईल लॉन्‍च केला आहे. याची किंमत फक्‍त 1094 रूपये इतकी असूनही याचे फीचर हे महागडया मोबाईल सारखे आहेत.
    या मोबाईलला 1.8 इंचाची टीएफटी स्‍क्रीन आहे. याची जाडी फक्‍त 14.9 मिलिमीटर इतकी आहे. त्‍याशिवाय यामध्‍ये ब्‍लूटूथ, मिनी युएसबी, एमपी 3, एमपी 4, एवीआय, 3 जी सपोर्टसारखे काही खास फीचर्सही आहेत. त्‍याशिवाय यामध्‍ये बिल्‍ट इन रेडिओदेखील आहे.
    इतकंच नव्‍हेतर यामध्‍ये व्‍हीजीए कॅमेरासुद्धा आहे. ज्‍याचा उपयोग व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्‍यासाठी करता येऊ शकतो. या मोबाईलला एक वर्षाची वॉरंटी देखील आहे.

Trending