आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MICROMAX ने लॉन्च केला 4G \'YU Smartphone Yureka\'; किंमत 8999 रुपये

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय मोबाइल मेकर कंपनी Mircomax ने गुरुवारी आपला पहिला नवा ब्रांड YU SMARTPHONE YUREKA लॉन्च केला. हा 4G सपोर्ट फोन असून यात CyanogenMod OS आहे. यात सर्व फीचर्सला कस्टमाइज करण्याची सुविधा असून CyanogenMod OS ऑटोमॅटीक प्रत्येक महिन्याला अपडेट होत असते.

4G सपोर्टवर हा फोन अवघ्या चार मिन‍िटांत फुल एचडी मूव्ही डाऊनलोड केला जाऊ शकतो. हे डिव्हाइस अधिकतम 150MBPS चा स्पीड देतो, अशी माहिती Micromax चे फाऊंडर राहुल शर्मा यांनी दिली.
YU ब्रांड स्मार्टफोन यूरेका ई-कॉमर्स साइट 'अमेजन डॉट कॉम'वरून खरेदी केला जाऊ शकतो. YU ची प्री-बुकींग 19 डिसेंबरला दुपारी दोन वाजता सुरु होणार आहे. जानेवारी 2015च्या दुसर्‍या आठवड्यापासून विक्री सुरु होणार आहे. या फोनची किंमत 8999 रुपये आहे. फोनसोबत फ्री रिप्लेसमेंट आणि रिपेअर वॉरंटीदेखील देण्यात आली आहे. ‍रिपेअर आणि रिप्लेसमेंटची सर्व्हिस यूजर्सला घरी मिळणार आहे. मात्र, हा फोन फक्त ऑनलाइन खरेदी केला जाऊ शकतो.

मुख्य फीचर्स
* 64 बिट क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 615 ऑक्टा-कोर प्रोसेसर
* 4G हॅंडसेट
* 5.5 इंचाचा HD डिस्प्ले स्क्रीन, 80 डिग्रीचा व्यूइंग अँगल
* गोरिल्ला ग्लास 3 प्रोटेक्शन, तीन पटीने स्क्रॅच रेजिस्टेंट
* अँडव्हान्स कनेक्टिव्हिटी
* LTE मोबाइल टीव्ही ब्रॉडकास्ट
* एड्रिनो 405 GPU
* 13 MP बॅक आणि 5 MP चा फ्रंट कॅमेरा

पुढील स्लाइड्‍सवर वाचा YU Smartphone Yureka मधील फीचर्स आणि सायानोजेनमोड ऑपरेटिंग सिस्टमविषयी...