आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पुणे - पिक विमा,सरकारी कंत्राटदाराचे देणे इथपासून ते शिष्यवृत्ती रकमेपर्यंत सर्व देणी थेट लाभार्थीच्या खात्यात जमा करण्याचे प्रमाण सध्या ७० टक्के असून ते येत्या चार ते पाच महिन्यात ९० टक्के होईल अशी माहिती महाराष्ट्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञान खात्याचे सचिव राजेश आगरवाल यांनी आज येथे पत्रकारांना दिली.
महिला सुरक्षा, आरोग्य सुविधा अशा अनेक बाबीत खासगी तंत्रज्ञांनी विकसित केलेल्या प्रणाली वापरण्यास सरकार प्रोत्साहन देत आहे असेही त्यांनी सांगितले. मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या सहकार्याने सरकारने अशा प्रणाली विकसित करत असलेल्या तंत्रज्ञांसाठी पुण्यात विंडोज अॅप फेस्ट आयोजित केला असून त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. ते पुढे म्हणाले की सध्या दुष्काळ असल्याने सांगली जिल्ह्यात पाण्याचा टॅंकर कधी येणार हे कळण्यासाठी आम्ही असेच अॅप्स वापरत आहोत आणि त्याचा वापर राज्यात सर्वत्र करण्याची सूचना दिली आहे.
ई गव्हरनन्सचा वापर करून नागरी समस्या लवकर सोडविता याव्यात यासाठी सरकारने हा घेतला असून त्याचाच एक भाग म्हणून फेस्ट आयोजित केल्याचे मायक्रोसोफ्टचे व्यवस्थापकीय संचालक संकेत अकेरकर यांनी नमूद केले.
शिक्षण , आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अशा प्रणालीचा वापर वाढत असून अंध आणि अपंग यांना ही माहिती सहज उपलब्ध व्हावी हा हेतू आहे असे नमूद करून आगरवाल म्हणाले की सरकारला आधार कार्ड, वीज बिल गरिबी रेषेखाली आहेत हे ताडून पाहण्यास अशा प्रणाली उपयुक्त ठरत आहेत.लोकांनी आपणहून माहिती द्यावी हा त्यामागचा हेतू आहे. अनेक नवे उद्योजक त्यातून तयार होतील.
जगात अशा प्रकारे प्रणाली विकसित करण्यात भारत पहिल्या स्थानावर असून एक लाख तीस हजार अॅप्सपैकी १५ हजार देशात विकसित झाल्याचे अकेरकर यांनी नमूद केले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.