आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतीय वंशाचे सत्या नडेला यांची मायक्रोस्फॉटच्या CEOपदी नुकतीच नियुक्ती झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सत्याच या पदाचे प्रमुख दावेदार असल्याचे बोलले जात होते. सत्या यांनी CEO पदाची सुत्रे स्विकारल्यानंतर मायक्रोस्फॉटचे संस्थापक बिल गेटस यांनी कंपनीचे तंत्रज्ञान सल्लागार म्हणून पद स्विकारले आहे. सत्या यांची मायक्रोस्फॉट प्रमुख म्हणून निवड झाल्यानंतर आपलेही भविष्य असेच उज्ज्वल शकते अशी आशा मणिपाल विद्यापिठातील विद्यार्थांमध्ये पाहायला मिळते. याच विद्यापिठातून इलेक्ट्रिकल इंजिनअरची पदवी पूर्ण केलेले सत्या 1992पासून बिल गेटससोबत काम करत आहेत. कामासंदर्भात बिल गेटस यांनी त्यांना केलेला ईमेल सत्याना आजही तोंडपाठ आहे. या ईमेलमध्ये बिल यांनी कोणत्यातरी प्रोडक्टमध्ये फीचर्स अॅड करण्याचे सांगितले होते. बिंगमध्ये काम करताना ते बिल यांच्या जास्त जवळ आले.
सत्या सांगतात, की माझा ओव्हर संपला होता ज्या मध्ये मी काही विशेष काम केले नव्हते. त्यानंतर कॅप्टनने बॉलिंग केली आणि टिमला त्याचा फायदाही झाला. कॅप्टनने इशारा करून कशी बॉलिंग करायची आहे ते सांगितले आणि पुढील ओव्हरसाठी माझ्याकडे चेंडू सोपवला. आता मला कसे खेळायचे आहे याचा पूर्ण अंदाज आला होता.
आतापर्यंत ग्रेट प्लेन्सचे संस्थापक डॉग बरगम, गेटस फाउंडिशनचे CEO जेफ रॅक्स, बिल गेट्स आणि स्टीव्ह बामर यांच्यासोबत सत्या यांनी काम केले आहे. आपल्या टिमविषयी महत्त्वाकांक्षा कशी असावी हे यांच्याकडून शिकल्याचे सत्या सांगतात. माझी नाळ आजही भारताशी जोडलेली आहे आणि मी आई- वडिलांना भेटण्यासाठी दर वर्षी भारतात जातोच असे सत्या सांगतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.