Home | Business | Gadget | microsoft launches its first tablet pc

मायक्रोसॉफ्टने आणला 'विंडोज-8'वर चालणारा टॅबलेट

वृत्तसंस्था | Update - Jun 19, 2012, 10:46 AM IST

'मायक्रोसॉफ्ट सरफेस' असे या टॅबलेटचे नाव असून 'विंडोज 8' या ऑपरेटींग सिस्टिमवर हा टॅबलेट चालणार आहे.

  • microsoft launches its first tablet pc

    टॅबलेटच्‍या विश्‍वात आता मायक्रोसॉफ्टनेही पाऊल टाकले आहे. मायक्रोसॉफ्टने पहिला टॅबलेट बाजारात सादर केला आहे. 'मायक्रोसॉफ्ट सरफेस' असे या टॅबलेटचे नाव असून कंपनीने नुकत्‍याच सादर केलेल्‍या 'विंडोज 8' या ऑपरेटींग सिस्टिमवर हा टॅबलेट चालणार आहे. नवा टॅबलेट ग्राहकांच्‍या पसंतीस उतरेल असा विश्‍वास कंपनीने व्‍यक्त केला आहे. कंपनीचे मुख्‍य लक्ष्‍य 'ऍपल'ची बाजारपेठ आहे. त्‍याव्‍यतिरिक्त इतर सर्व कंपन्‍यांच्‍या टॅबलेटला 'सरफेस' मागे टाकेल, असा दावाही कंपनीने केला आहे. अद्ययावत आणि सर्वाधिक लेटेस्‍ट ऑपरेटींग सिस्टिमने सुसज्‍ज असलेला हा टॅबलेट निश्चित तांत्रिकदृष्‍ट्या सक्षम राहणारच आहे. 'मायक्रोसॉफ्ट'च्‍या नव्‍या उत्‍पादनाबाबत बाजारात प्रचंड उत्‍सुकता होती.

Trending