आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Microsoft Launches Lumia 535 Low Budget Selfie Phone

\'मायक्रोसॉफ्ट\'ने लॉन्च केला \'ल्युमिया 535\' सेल्फी फोन, वाचा स्मार्ट फीचर्स

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: Microsoft Lumia 535)
'मायक्रोसॉफ्ट' कंपनीने मंगळवारी आपला पहिला ब्रांड फोन 'ल्युमिया 535' लॉन्च केला. नव्या फोनला जुना 'ल्युमिया 530'ची सुधारित आवृत्ती म्हणावी लागेल. मायक्रोसॉफ्टने आतापर्यंतचा सगळ्यात लो बजेट फोन सादर केला आहे. 5 इंचाच्या डिस्प्लेसोबत न्यू 'ल्युमिया 535' नवा लुक देण्यात आला आहे. 'नोकिया' या नावाविना सादर झालेल्या या फोनमध्ये इन्बिल्ट डेनिम अपडेट असेल. तसेच विंडोज 8.1 फोन ऑपरेटिंग सिस्टमवर हा फोन काम करेल.

'ल्युमिया 535'मध्ये 5 मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा तसेच 5 मेगापिक्सचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. कॅमेरा लेंसची फोकल लेंथ 24mm इतकी आहे. 'ल्युमिया 535' हा हुबेहुब ल्युमिया 730/735 सारखाच दिसतो. 'ल्युमिया 535' हा फोन सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी शानदार ठरेल, असा दावा कंपनीने केला आहे. कॅमेरा फीचर्ससोबत मायक्रोसॉफ्टचे प्री लोडेड ऐप्ससारखे स्काइप आणि वननोट उपलब्ध आहे.
मायक्रोसॉफ्टच्या कन्वर्जेशन ब्लॉगवरील लिस्टिंगनुसार, नोव्हेंबरच्या मध्यात हा फोन चीन, बांगलादेश आणि हॉंगकॉंगमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. या फोनची किंमत जवळपास 8500 रुपये असू शकते. यानंतर हा फोन अन्य देशात लॉन्च होईल. भारतीय बाजारात हा फोन केव्हा दाखल होईल, याबाबत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.
पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून जाणून घ्या, फोनचे अन्य फीचर्स...