आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Microsoft To Acquire Nokia\'s Handset Biz For USD 7.17 Bn

मायक्रोसॉफ्टकडे नोकिया मोबाईलचा ताबा, व्‍हेरिझॉन-व्‍होडाफोनमध्‍येही झाली बिग डील

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- सॉफ्टवेअर क्षेत्रातील आघाडीची कंपनी मायक्रोसॉफ्ट मोबाईल उत्‍पादक कंपनी नोकियाचा ताबा घेणार आहे. मोबाईल निर्मिती क्षेत्रासाठी ही एक मोठी घडामोड आहे. नोकियाच्‍या हॅण्‍डसेट उत्‍पादनाचा ताबा मायक्रोसॉफ्ट 7.17 बिलियन अमेरिकन डॉलर्स देऊन विकत घेणार आहे. ही रक्‍कम रोख स्‍वरुपात देण्‍यात येणार आहे. नोकियाची स्‍मार्टफोन क्षेत्रातील स्थिती बरीच माघारली आहे. ती बळकट करण्‍यासाठी हे पाऊल आहे.

यासंदर्भात देण्‍यात आलेल्‍या माहितीनुसार, नोकियाचे सर्व हॅण्‍डसेट आणि संबंधित व्‍यवसाय खरेदी करण्‍यासाठी 3.79 बिलियन युरो देण्‍यात येतील. तर, 1.65 बिलियन युरो नोकियाच्या पेटंट्सचा ताबा घेण्‍यासाठी देण्‍यात येतील. यासाठी मायक्रोसॉफ्ट परदेशातील भांडवल गुंतविणार आहे. हा संपूर्ण व्‍यवहार 2014च्‍या पहिल्‍या तिमाहीपर्यंत पूर्ण होण्‍याची अपेक्षा आहे. या व्‍यवहारात नोकियाच्‍या नकाशे वापरण्‍याच्‍या सुविधा आणि परवान्‍यांचाही समावेश राहणार आहे.


या डीलनंतर नोकियाचे सीईओ स्‍टीफन एलॉप मायक्रोसॉफ्टमध्‍ये रुजू होणार आहेत.

व्‍हेरिझॉन-व्‍होडाफोनमध्‍ये अब्‍जावधींचा झाला व्‍यवहार... वाचा पुढील स्‍लाईड्समध्‍ये...