आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Microsoft To End Windows Xp Support, How To Upgrade Windows Xp

WINDOWS XP आजपासून कालबाह्य, असा सुरक्षित ठेवा कॉम्प्यूटर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संगणक क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी 'मायक्रोसॉफ्ट' आपली सगळ्यात लोकप्रिय ऑपरेटिंग सिस्टम 'WINDOWS XP'चा टेक्निकल सपोर्ट आजपासून (मंगळवार) बंद करणार आहे. त्यामुळे जगभरात सर्वाधिक काळ अस्तित्त्वात असणारी 'WINDOWS XP' उद्या अर्थात बुधवारपासून कालबाह्य होणार आहे.

'WINDOWS XP'चा जगभरात सर्वाधिक वापर केला जातो. मात्र, ग्राहकांना आजपासून सिक्युरिटी अपडेट, ऑनलाईन टेक्निकल कंटेंट अपडेट मिळू शकणार नाही. त्यामुळे याचा सगळ्यात मोठा फटका देशातील बॅंकिंग क्षेत्राला बसणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

देशभरातील बहुतेक बॅंकाचे एटीएम अजूनही 'WINDOWS XP' या ऑपरेटिंग सिस्टमवर सुरु आहेत. त्यामुळे याचा फटका बँकांना सर्वाधिक बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, फक्त जुन्या एटीएमवर याचा परिणाम होईल, नव्या एटीएमला त्याचा फटका बसणार नाही, असे इंडियन बँक्स असोसिएशनतर्फे सांगण्यात आले आहे.

भारतात कंपन्यांमधील सुमारे 40 लाख कॉम्प्युटरमध्ये 'WINDOWS XP' ऑपरेटिंग सिस्टम आहे. मात्र, त्यामधील 84 टक्के कंपन्या नवी ऑपरेटिंग सिस्टम वापरत आहेत. हा टेक्निकल सपोर्ट बंद केल्याने 'WINDOWS XP' वापरली तर यामुळे सायबर क्राईमची भीती वाढेल, तसेच नवे हार्डवेअर सिस्टमला सपोर्ट करणार नसल्याचेही 'मायक्रोसॉफ्ट'चे संचालक टिम रेन्स यांनी स्पष्ट केले आहे.

'मायक्रोसॉफ्ट'ने ऑक्टोबर 2001मध्ये 'WINDOWS XP'ही ऑपरेटिंग सिस्टम लॉन्च केली होती. सध्या ती ‘'WINDOWS XP SERVICE PACK 3' या नावाने ओळखली जाते.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या, 'मायक्रोसॉफ्ट'द्वारा सपोर्ट बंद केल्यानंतर कसा सुरक्षित ठेवाल आपला कॉम्प्युटर...