आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Microsoft To Launch Windows 10 Today, Specification And Features

आज लॉंच होणार Windows 10, नवीन स्मार्टफोन; Internet Explorer जाणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विंडोज 10 चा कन्झ्युमर प्रिव्हु आज लंडनमध्ये लॉंच होणार आहे. स्थानिक वेळेनुसार सकाळी 9 वाजता (भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री 10.30 वाजता) लॉंचिंग इव्हेंट सुरु होणार आहे.
काय खास आहे या इव्हेंटमध्ये
या इव्हेंटमध्ये विंडोज 10 चा कन्झ्युमर प्रिव्हुच नव्हे तर काही स्मार्टफोन ऑप्शनही लॉंच होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.
नवीन ब्राऊजर
गेल्या काही दिवसांपासून Internet Explorer च्या जागी नवीन ब्राऊजर येण्याची चर्चा रंगली होती. आता कंपनीने यासंदर्भात महत्त्वपूर्ण संकेत दिले आहेत. IE च्या जागी आता नवीन इंटरनेट ब्राऊजर (कोड नेम स्पार्टन) लॉंच केले जाणार आहे. या ब्राऊजरच्या फिचर्सची माहिती गोपनिय ठेवण्यात आली आहे. परंतु, हाती आलेल्या माहितीनुसार क्रोम आणि फायरफॉक्सला टक्कर देण्यासाठी काही नवीन फिचर्स अॅड करण्यात आले आहेत.
विंडोज 10 मोबाईल
या इव्हेंटमध्ये विंडोज 10 ऑपरेटिंग सिस्टिमवर काम करणारा मोबाईलही लॉंच केला जाण्याची दाट शक्यता आहे. गेल्या वेळी आयोजित करण्यात आलेल्या इव्हेंटमध्ये विंडोज 10 पीसी लॉंच करण्यात आले होते. चीनच्या एका वेबसाईटचे याचे छायाचित्र लिक केले आहे.
कोर्टाना
विंडोज 10 च्या सर्वांत महत्त्वपूर्ण फिचर्सपैकी कोर्टाना एक आहे. मायक्रोसॉफ्टचे हे पर्सनल व्हॉइस असिस्टंट खुप चर्चेत आहे. याशिवाय विडोंज 10 मध्ये अॅप्सना नवीन स्वरुपात सादर केले जाण्याची शक्यता आहे. अपडेटेड कॅमेरा, कॅल्क्युलेटर, गेमिंग सारखे अनेक अॅप ग्राहकांसाठी महत्त्वपूर्ण राहणार आहेत.
या इव्हेंटमध्ये काय काय लॉंच होणार यासाठी वाट बघावी लागणार असली तरी सप्टेंबर महिन्यात विंडोज 10 च्या प्रिव्ह्युमध्ये कंपनीने अनेक फिचर्स सादर केले होते. त्यावरुन कन्झ्युमर प्रिव्हुमध्ये कसे फिचर्स राहतील याचा अंदाज बांधता येतो.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन वाचा, विंडोज 10 प्रिव्ह्युमध्ये दाखवण्यात आलेल्या फिचर्ससंदर्भात...