आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Microsoft Unveils Windows 10, Added New Features News In Divyamarathi

MICROSOFT ने दाखवली \'WINDOWS-10\' ची झलक, बघा प्रिव्ह्यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: नव्या ओएसबाबत माहिती देताना माइक्रोसॉफ्टचे अधिकारी)

मायक्रोसॉफ्टने आपली बहुचर्चित ऑपरेटिंग सिस्‍टम 'WINDOWS- 9 ' लॉन्च करेल अशी अपेक्षा होती परंतु कंपनीने 'WINDOWS-10'वरूनही पडदा उठवला आहे. मंगळवारी (30 सप्टेंबर) एका छोट्या कार्यक्रमात लेटेस्‍ट ''WINDOWS-10''चा प्रिव्ह्यू लॉन्‍च केला. मोबाइल, पीसी आणि टॅबलेटला डोळ्यासमोर ठेऊन ''WINDOWS-10''ची बांधणी करण्यात आल्याच मायक्रोसॉफ्टच्या सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, सन 2012 मध्ये ''WINDOWS-8' सादर केल्यानंतर एक्‍सपर्ट्‍सला ''WINDOWS-9'' लॉन्‍च होईल अशी आशा होती. यासोबत मायक्रोसॉफ्टने आपले लेटेस्‍ट ओएस 'WINDOWS-10' चा प्रिव्ह्यू लॉन्च करून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. 'WINDOWS-10'मध्ये 'स्‍टार्ट मेन्‍यू'ला परत आणणे आहे.

'WINDOWS-8' मध्ये 'स्टार्ट मेन्यू' आणण्‍याचे फीचर नसल्याने यूजर्सच्या अनेक तक्रारी होत्या. या तक्रारी लक्षात घेवून गेल्या वर्षी कंपनीने 'WINDOWS-8.1' लॉन्‍च करून त्यात 'स्‍टार्ट बटण'ची सुविधा उपलब्ध करून दिली होती.

'याहू टेक'च्या रिव्ह्यूमध्ये पत्रकार डेव्हिड पोग यांनी लिहिले आहे की, 'WINDOWS-10' आधी सादर केलेल्या 'WINDOWS-8' अथवा 8.1 च्या तुलनेत 'WINDOWS-10' मध्ये खूप सुविधा आहेत. युजर्सला हे ओएस हाताळताना कोणतीही अडचण येणार नाही.

2015 पर्यंत दाखल होईल बाजारात...
मायक्रोसॉफ्टचे 'WINDOWS-10' चा प्रिव्ह्यू सन 2015 मध्ये बाजारात उपलब्‍ध होणार असल्याची माहिती सूत्रांन‍ी दिली आहे.

'WINDOWS-10'चा प्रिव्ह्यू करा डाउनलोड...
'WINDOWS-10' चा टेक्निकल प्रिव्ह्यू मायक्रोसॉफ्टने आपल्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध करून दिला आहे. तिथून तो डाउनलोड करता येईल. आजपासून (1 ऑक्टोबर) यूजर्स preview.windows.com वरील प्रिव्ह्यू मिळवता येईल. 'WINDOWS-10' चा प्रिव्ह्यू डाऊनलोड करताना युजर्सला बग्‍स तसेच अन्‍य तांत्रिक समस्या येण्याची शक्यता आहे.

खास वैशिष्ट्ये...
'WINDOWS-10' हे 'WINDOWS- 8' प्रमाणे टाइल्स असलेला इंटरफेस नसला तरी की-बोर्ड अथवा माऊस वापरणार्‍यांना कुठलीही समस्या येणार नाही. की -बोर्ड वापरणार्‍यांना 'स्‍टार्ट मेन्‍यू' मिळेल. स्‍टार्ट मेन्‍यूमध्ये टाइल्‍सचे फीचर देण्यात आले आहे. टच मोडमध्ये युजर्सला फुल टाइल इंटरफेस मिळेल. मायक्रोसॉफ्टचे व्हाइस प्रेसिडेंट (विंडोज ग्रुप) जो बिलफोर्ड यांच्या मते, की-बोर्ड तसेच माउस हाताळणार्‍या यूजर्सला कोणतीच समस्या येणार नाही.

'WINDOWS-10'मध्ये काही नवे फीजर्स जोडले आहे. सर्च रिझल्‍टमध्ये आपल्या कॉम्प्यूटरशिवाय इंटरनेटची लिस्‍ट‍िंगदेखील उपलब्ध असेल. याशिवाय टास्‍क व्ह्यूदेखील पाहायला मिळेल. यूजर टास्‍क बारवरील बटणावर क्लिक करेल तर त्याच्यासमोरील स्क्रीनवर उघड्या असलेल्या विंडोज छोट्या-छोट्या प्रिव्हूमध्ये पाहाता येतील.

नव्या ओएसमध्ये आधी पेक्षा शानदार कमांड प्रॉम्‍ट देण्यात आला आहे. 'WINDOWS-10'मध्ये मल्टीटास्किंगची सुविधा मिळेल. अनेक विंडो डेस्कटॉपवर वेगवेगळ्या साइजमध्ये सेट करून काम करता येईल. टच यूजर्ससाठी मोठे बटण देण्यात आले आहे . आधीच्या तुलनेत ते जास्त 'टच फ्रेंडली' असतील.

अनेक व्हर्च्युअल डेस्कटॉप विंडो उघडू शकतात. एक विंडोमध्ये सुरु असलेले अँप दुसर्‍या व्हर्च्युअल डेस्कटॉपवर घेऊन जाता येईल. विशेष म्हणजे याला फोन अथवा टॅबलेटच्या स्क्रीनशी जोडता येईल. त्यांना स्वाइप करून पाहाता येईल.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, 'WINDOWS-10'चे छायाचित्रांसह 10 फीचर्स...