मायक्रोसॉफ्ट कंपनीने 30 सप्टेंबरला भारतात विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमासाठी मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला या कार्यक्रमासाठी पहिल्यादा भारतात येत आहेत. मायक्रोसॉफ्टच्या कार्यक्रमाचे सर्व मीडियाला निमंत्रणेही पाठवल्याचे सूत्रांनी सांगितले.
सत्या नाडेला भारतात येत आहेत म्हणजे मायक्रोसॉफ्टचा हा इव्हेट किती महत्त्वाचा असेल, असेल याची कल्पना येते. सत्या नाडेला या खास कार्यक्रमाच्या माध्यमातून टेक्नॉलॉजीबाबत भारतीयांसोबत संवाद साधतील. व्यापार विकसित करण्याच्या दृष्टीकोनातून मार्गदर्शन करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
सत्या नाडेला आणि भास्कर प्रमाणिक (मायक्रोसॉफ्टचे चेअरमन, भारत) यांच्याशी नव्या व्हर्जनबाबत चर्चा करतील. विशेष म्हणजे
नोकियाशी संबंधित घोषणा होण्याची शक्यता आहे.
Threshold, हे 'विंडोज 9'चे कोडनेम आहे. कंपनीच्या फ्लॅगशिप प्रॉडक्टमध्ये 'विंडोज 9' ही मोठी रिलिज मानली जाते. 'विंडोज 9'ची घोषणा 'विंडोज 8'सोबतच करण्यात आली होती.
'न्यू सॉफ्टवेअर व्हर्जन'ला टेक कंपनी अँप्स डेव्हलपमेंट प्लेटफॉर्मच्या धर्तीवर तयार केली जात आहे. या माध्यमातून विंडोज पीसी, विंडोज RT आणि विंडोज फोन चालवता येणे शक्य आहे.
मास कन्झ्युमर्ससाठी 2015 मध्ये 'विंडोज 9' रिलिज करण्यात येणार आहे.
दुसरीकडे, कंपनीने याच दिवशी 'विंडोज 9'चा रिव्ह्यूसाठी 'सेन फ्रान्सिसकोमध्ये एका कार्यक्रमाचेही आयोजन केले आहे. कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर याबाबत माहिती देण्यात आली आहे.
(फोटो माइक्रोसॉफ्ट लोगो)