आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिडकॅप फंडांकडून भरभरून परतावा, स्मॉल कॅप फंडांची कामगिरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - गुंतवणूकदारांना भरभरून परतावा देण्यात सध्या स्मॉल आणि मिडकॅप फंड महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे व्हॅल्यू रिसर्चने केलेल्या एका सर्वेक्षणात दिसून आले आहे. त्यातही रिलायन्स स्मॉल कॅप फंडाने चमकदार कामगिरी केली आहे.

गुंतवणूकदारांनी काळजीपूर्वक समभागांची निवड केल्यामुळे रिलायन्स स्मॉल कॅपला चांगली कामगिरी करता आली. आमच्या गुंतवणूक निर्णयांबाबत आम्ही आक्रमक असून अनेक मिडकॅप तसेच स्मॉल कॅप कंपन्यांचे मूल्य अद्यापही आकर्षक असल्याचा विश्वास रिलायन्स म्युच्युअल फंडाचे मुख्य गुंतवणूक अधिकारी सुनील सिंघानिया यांनी सांगितले.

परताव्याचा चढता आलेख असा
लार्ज कॅप फंड - 50%, एचडीएफसी टॉप 200 - 49%, बिर्ला सनलाइफ प्युअरल व्हॅल्यू फंड - 97%, डीएसपी ब्लॅक रॉक मायक्रो कॅप फंड (रेग्युलर प्लॅन) - 87.72%, यूटीआय मिड कॅप फंड : 83%, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल व्हॅल्यू डिस्कव्हरी फंड (रेग्युलर प्लॅन) - 81%.
रिलायन्स स्मॉल कॅप फंड : 107%, बीएसई स्मॉल कॅप इंडेक्स : 80% परतावा.
रिलायन्स स्मॉल कॅप फंडातील कंपन्यांनी दिलेला परतावा : टीव्हीएस मोटर्स : 351%, सिंएट : 372%, अतुल इंडस्ट्रीज : 264%