आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मध्‍य युरोपीय देशांचा पर्यटन वाढीसाठी खास प्रयत्‍न

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- मध्य युरोपातील चार देशात भारतातून 2012 मध्ये गेलेल्या पर्यटकांची संख्या 60 हजार असून ती आगामी दोन वर्षात पाच ते सहा टक्के वाढेल अशी अपेक्षा चेक प्रजासत्ताक पर्यटन विभागाचे संचालक जान हेर्गेट यांनी दिली.

चेक प्रजासत्ताक, पोलंड, हंगेरी आणि स्लोवाकिया या चार देशांचे प्रतिनिधी सध्या भारत भेटीवर आले आहेत. पर्यटक संख्या वाढावी आणि अधिक उत्पन्न मिळावे यासाठी पुण्यासह, मुंबई, चेन्नई, बंगलोर या शहरांचा दौरा करत आहेत. याबाबत अधिक माहिती देताना हेर्गेट म्हणाले, की विवाह समारंभापासून ते गोल्फ खेळू इच्छिणारे उद्योजक यापर्यंत विविध प्रकारच्या पर्यटकांना भेट देत येईल अशी ठिकाणे आणि कार्यक्रम चारही देशात आयोजित केले जातात. एकट्या चेक प्रजासत्ताकाने पर्यटन वृद्धीसाठी 40 लाख युरो रक्कम खर्च करण्याचे ठरवले आहे. जर्मन व्हिसा घेऊन चारही देशात पर्यटनाला जाण्याची सुविधा हे देश देत आहेत.

फनासारखा हिंदी चित्रपट चेक प्रजासत्ताकमध्‍ये चित्रित झाला आणि अमिताभ बच्चन त्‍या देशात लोकप्रिय आहे. भारत, चीन आणि जपानमधील पर्यटकांसाठी आय लाईक पोलंड ही मोहीम राबवण्‍यात येत आहे.

हंगेरी ही स्पाची जागतिक राजधानी म्हणून विकसित झाली असून वैद्यकीय पर्यटनासाठी अनेक आशियायी लोक या देशात येत आहेत. हंगेरीच्या प्रतिनिधी क्रिस्टीना बास्का म्हणाल्या, की हनिमून, बेटांवरील पर्यटन आणि डान्यूब नदी महोत्सव ही आमच्या पर्यटनाची वैशिष्ट्ये आहेत.

चीनमधून येत असलेल्या पर्यटकांची संख्या भारतापेक्षा मोठी आहे मात्र आम्ही आता भारतावर अधिक लक्ष केंद्रित करत आहोत असे त्यांनी सांगितले. जर्मन व्हिसा घेऊन या चारही देशात पर्यटन करता येते अशी माहितीही त्यांनी दिली