Home | Business | Auto | mini cars may come in 2 months

दोन महिन्यांत रस्‍त्‍यावर धावणार अनेक छोट्या कार

बिझनेस ब्युरो । नवी दिल्ली | Update - Jun 15, 2011, 07:28 AM IST

येत्या दोन महिन्यांत भारतीय कार बाजारात वेगवेगळ्या कंपन्यांच्या अनेक छोट्या कारचे आगमन होणार आहे. टोयोटा, मारुती व होंडा या कंपन्यांनी त्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे.

  • mini cars may come in 2 months

    येत्या दोन महिन्यांत भारतीय कार बाजारात वेगवेगळ्या कंपन्यांच्या अनेक छोट्या कारचे आगमन होणार आहे. टोयोटा, मारुती व होंडा या कंपन्यांनी त्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे.

    जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात टोयोटा कंपनी भारतात टोयोटा इडिओस लीवा ही कार आणणार आहे.टोयोटाची ही पहिलीच छोटी कार असेल.या करची किमत 4 लाख 20 हजार ते 5 लाख 50 हजार रूपयांपर्यंत राहील.

    जनरल मोटर्स बीटचे डिझेल व्हर्जन बाजारात उतरवण्याच्या तयारीत आहे.ही भारतातील सर्वात छोटी व किफायतशीर कार असेल असा कंपनीचा दावा आहे. प्रतिलीटर 24 किलोमीटर मायलेज असणार्‍या या कारची किमत असेल 4 लाख 50 हजार रुपये. मारूतीची स्विफ्ट नव्या स्वरूपात ऑगस्टमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. दिसायला जुन्या स्विफ्टप्रमाणे असली तरी तांत्रिकदृष्ट्या यात अनेक नवे बदल असतील.हिचे इंजिन 85 बीएचपीच्या ऐवजी वाढवून 87 बीएचपी शक्तीचे असेल.हिच्या रंग-रूपातही छोडे बदल होण्याची श्क्यता सूत्रांनी वर्तवली,या नव्या स्विफ्टची किमत 5ते 6 लाख रूपयांदरम्यान राहण्याची शक्यता आहे. जपानच्या कार बाजारात धूम गाजविणारी मारूती-सवरे भारतातही धमाका करेल अशी कंपनीची अपेक्षा आहे. दीड ते दोन लाख रूपयांदरम्यान किमत असणारी ही कार 600 सीसीची असून , 60 बीएचपी शक्तीची आहे.

    गतवर्षी होंडाने दिल्लीतील प्रदर्शनात सादर केलेली व त्यावेळी सर्वांचे आकर्षण बनलेली होंडा ब्रायो ही कार लवकरच भारतातील रस्त्यांवर अवतरण्याची शक्यता आहे. होंडाने थायलंड मद्ये ही कार सादर केली आहे. चांगले मायलेज देणार्‍या ब्रायोचे ग्राउंड क्लिअरन्स चांगले आहे.या कारची किमत 5 लाखांपर्यंत राहण्याची शक्यता आहे.Trending