आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवाळीत ‘मिनी कुपर-एस’ची भेट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीएमडब्ल्यूची मिनी कुपर-एस ही थर्ड जनरेशन कार आहे. हिला अत्याधुनिक, सक्षम आणि आकर्षक मिनी कुपर कार म्हटले जात आहे. नव्या कारमध्ये पुढची बाजू आणि रिअर ट्रॅकची रुंदी विस्तारित केली आहे. मात्र, उंची जुन्या कारप्रमाणेच आहे. हॅक्सागॉनल ग्रील, क्लॅमशॅल बोनट आणि फ्लोटिंग रूफसारखे नवे फीचर्स आहेत.

- याच्या गोलाकार हेडलाइटच्या दोन्ही बाजूला एलईडी स्ट्रिप आहे. टेललाइटचा आकार खूप मोठा आहे. जुन्या कारच्या तुलनेत बूट मोठे आहे. मात्र, ऐसपैस नाही.

- नव्या मिनीत स्पीडोमीटर त्याच्या पूर्वीच्या जागीच म्हणजे स्टिअरिंग व्हीलच्या मागे आहे. सेंटर कन्सोलमध्ये 8.8 इंच स्क्रीन, ऑडिओ, नेव्हिगेशन, कनेक्टिव्हिटी फंक्शन आणि रिव्हर्स कॅमेरा आहे.

- ड्रायव्हिंग मोड बदलल्यास डिस्प्ले स्क्रीनही बदलते. ग्रीन मोडवर सिस्टिम स्मूथनेस व इफिशिएंट रेट करेल. स्पोर्ट मोडवर कन्सोलच्या आजूबाजूस एलईडी ग्लो दिसेल.

- केबिनमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आणि रेट्रो, सक्यूलर एलिमेंटचे कॉम्बिनेशन आहे. संपूर्ण कॅबिनमध्ये डॅशबोर्डपासून ते दरवाजापर्यंत प्लास्टिक टेक्श्चर पीस वापरले आहेत. स्टिअरिंग व्हीलवर जाड कव्हर आहे.

- 7 सेकंदांत कार ताशी 100 कि.मी. वेगाने धावते. सीडेड ड्रायव्हिंगमुळे केबिनमध्ये आवाज येत नाही.