Home | Business | Gadget | mini laptop, low cost only 2200 hundred, business, national.

आता लॅपटॉप मिळणार फक्त २२०० रुपयांत

agency | Update - Jun 09, 2011, 02:00 PM IST

मनुष्यबळ विकास मंत्रालयाने लॅपटॉप तयार केला असून त्याची किंमत २२०० रुपये एवढी आहे.

 • mini laptop, low cost only 2200 hundred, business, national.

  laptop_258आपल्याला ज्या गोष्टीची प्रतिक्षा होती ती आता संपली आहे. होय भारत सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाने एक स्वस्त लॅपटॉप तयार केला असून त्याची किंमत फक्त २२०० रुपये एवढी कमी ठेवली आहे.
  मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून या महिन्याच्या अखेरीपर्यंत राजस्थानमधील आयआयटी जोधपूर येथील संस्थेला दहा हजार लॅपटॉप उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. तसेच पुढील चार महिन्यात देशातील विविध शिक्षण संस्थांना सुमारे ९० हजार लॅपटॉप पुरविण्यात येणार आहेत.
  बुधवारी झालेल्या शिक्षणमंत्र्यांच्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली. मनुष्यबळ विकास मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱयांने सांगितले की, आम्ही एक लाख लॅपटॉप तयार केले असून, प्रत्येक राज्याला तीन-तीन हजार लॅपटॉप देण्यात येतील. केंद्र सरकारने याला ५० टक्के अनुदान देण्याचे जाहीर केले असल्यामुळे विद्यार्थ्यांना केवळ ११०० रुपये द्यावे लागणार आहेत.
  मंत्रालयाने हे लॅपटॉप केवळ १५०० रुपयांना विकण्याचे ठरविले होते मात्र महागाई वाढल्यामुळे सरकारने त्यात वाढ करुन २२०० रुपये एवढी किंमत ठरविली.
  सरकारी सूत्रांनी सांगितले, की जर महागाई कमी झाली तर, यापुढे तयार होणाऱया लॅपटॉपची किंमत पुन्हा १५०० रुपये करण्यात येणार आहे. या लॅपटॉपची स्क्रीन ७ इंच आहे. तसेच २ दोन यूएसबी पोर्ट व त्याची बॅटरी तीन तास चालते. त्याचा मेमरी सपोर्ट १६ जीबी एवढा आहे.Trending