आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Minor Inflation Rate 9.31 Percent; Common Man Get Relif

किरकोळ महागाईचा दर 9.31 टक्के; सर्वसामान्यांना मात्र दिलासा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - औद्योगिक उत्पादनाने निराशा केलेली असली तरी किरकोळ महागाई सलग तिस-या महिन्यात घसरल्यामुळे बराच दिलासा मिळाला आहे. भाजीपाल्याच्या किमतीत लक्षणीय वाढ झालेली असली, तरी खाद्य तेल आणि प्रथिनयुक्त पदार्थांच्या किमती कमी झाल्यामुळे मे महिन्यामध्ये किरकोळ महागाई 9.31 टक्के झाली आहे. अगोदरच्या मार्च महिन्यात 10.39 टक्क्यांवरून घसरून एप्रिलमध्ये 9.39 टक्क्यांवर आली होती. शहरी भागातील किरकोळ महागाईचा दर हा एप्रिल महिन्यातील 9.73 टक्क्यांवरून कमी होऊन 9.65 टक्क्यांवर आला आहे. ग्रामीण भागातील हाच महागाईचा दर एप्रिल महिन्यातील 9.16 टक्क्यांवरून कमी होऊन 8.98 टक्क्यांवर आला आहे. रिझर्व्ह बॅँकेच्या 17 जून रोजी जाहीर होणा-या नाणेनिधी धोरण आढाव्यात किरकोळ महागाईतील घट विचारात घेतली जाण्याची शक्यता आहे.


महागाईचा आलेख
घटक एप्रिल मे
खाद्य आणि पेय 10.61 % 10.65 %
भाजीपाला 5.43 % +9.78 %
अंडी, मांस, मास 13.60 % 13.52 %
तेल, चरबीयुक्त पदार्थ 7.52 % 5.49 %
डाळी 9.21 % 9.59 %