आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Mitashi Edutainment Company News In Marathi, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मिताशीने सादर केला ४० इंची स्मार्ट टीव्ही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मिताशी एज्युटेन्मेट कंपनीने नवा ४० इंचांचा एलईडी स्मार्ट टीव्ही सादर केला. राजस्थान रॉयल्स संघातील खेळीडूंच्या हस्ते या टीव्हीचे सादरीकरण करण्यात आले. या वेळी राहुल द्रविड, प्रवीण तांबे, अभिषेक नायर यांच्यासह मिताशीचे सीएमडी राकेश दुगर, सहसंस्थापक व संचालक हसमुख गाडा उपस्थित होते.

ऑगस्टमध्ये कंपनीने ४-के यूएचडी एलईडी टीव्ही बाजारात आणला होता. आता एलईडी स्मार्ट टीव्ही सादर केला आहे. या वेळी झालेल्या कार्यक्रमात राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूंना नवा स्मार्ट टीव्ही भेट देण्यात आला.

४० इंची स्मार्ट टीव्हीचे फीचर्स -
अँड्राॅइड ४.४.२ िकटकॅट, सुपर स्लिम डिझाइन, वायरलेस माऊस व की-बोर्ड, १९२० बाय १०८० रिझोल्युशन, तीन यूएसबी पोर्ट््स, प्लग अँड प्ले फीचर, २७ चित्रपट फॉर्मेटमुळे डीव्हीडी
प्लेअरची गरज नाही
ग्राहकांना वाजवी दरात नवनवीन तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यावर मि ताशीचा भर राहील, आगामी काळात अशीच उत्पादने कंपनी सादर करणार आहे.
राकेश दुगर , सीएमडी, मिताशी