आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिटकॉन कन्‍सल्‍टन्‍सी भागविक्रीद्वारे उभारणार भांडवल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- अभियांत्रिकी सल्लासेवा क्षेत्रातील मिटकॉन कन्सल्टन्सी प्राथमिक भागविक्रीद्वारे भांडवल उभारत असून त्या निधीचा वापर करून बंगलोर आणि अहमदाबाद येथे पर्यावरण प्रयोगशाळा उभारल्या जाणार आहेत. दहा रुपये दर्शनी मूल्याचे 41 लाख शेअर 51 रुपये अधिमुल्य आकारून विकले जाणार असून त्याद्वारे 25.01 कोटी रुपये मिळणार आहेत असे व्यवस्थापकीय संचालक प्रदीप बावडेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

कर्जाचा कोणताही बोजा या कंपनीवर नसून सातत्याने 15 टक्के लाभांश दिला जातो आहे. ते म्हणाले, की लघु आणि मध्यम आकाराच्या उद्योगांसाठी राष्ट्रीय शेअर बाजाराने सुरु केलेल्या इमर्ज या नव्या मंचावर कंपनीचा शेअर नोंदला जाणार आहे. भागविक्री 15 ऑक्टोबरला सुरु होऊन 18 तारखेला संपेल. गेल्या तीन दशकात कंपनीने, उर्जा, पर्यावरण, पर्यावरण प्रमाणन या क्षेत्रात प्राविण्य संपादित केले असून बँका, पायाभूत, सुविधा जैवतंत्र या क्षेत्रात काम करत असलेल्या उद्योगांना सल्ला सेवा दिली आहे. आजारी उद्योगांची कर्ज फेररचना इथपासून ते मालमत्ता व्यवसाय मुल्याकन सेवा कंपनी देते असे नमूद करून ते म्हणाले, की भांडवल उभारणी झाल्यावर महाराष्ट्राबाहेर व्यवसाय विस्तार करणे सोपे जाणार आहे. बंगलोर, हैद्राबाद, चेन्नई, नवी दिल्ली या ठिकाणी कार्यालये सुरु केली जाणार आहेत. कंपनीने 96 प्रकल्पांची कार्बन क्रेडीट मिळण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाकडे नोंदणी केली आहे गेली तीन वर्षे 18-22 टक्के दराने नफ्याचा फरक राखत निव्वळ नफा मिळवला आहे.