आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फॅमिली बिझनेस टिकवण्यासाठी मिटकॉन सरसावले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असणारे कौटुंबिक व्यवसाय (फॅमिली बिझनेस) संकटात आहेत. एफडीआयच्या माध्यमातून येऊ पाहणार्‍या बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या स्पर्धेमुळे या फॅमिली बिझनेसपुढील समस्या अधिक बिकट होण्याची शक्यता वाढली आहे.

सीआयआय फॅमिली बिझनेस नेटवर्क, भारत विभाग यांच्यातर्फे नुकत्याच करण्यात आलेल्या सर्वेक्षणात हे चित्र स्पष्ट झाले आहे. आज देशातील 85 टक्के व्यवसाय वा कंपन्या फॅमिली बिझनेस गटात मोडतात आणि विविध कारणांमुळे त्या संकटात आहेत. 21 व्या शतकातील वेगळी आव्हाने, युवा पिढीची निराळी मानसिकता, कुटुंब स्तरावरील वैयक्तिक मतमतांतरे अशा अनेक कारणांनी बहुतेक कौटुंबिक व्यवसायांना घेरले आहे, असे सर्वेक्षणात म्हटले आहे.ही आहेत कारणे
दोन पिढ्यांमधील वाद
कौटुंबिक व्यावसायिकाचा अकाली मृत्यू
नव्या पिढीला पारंपरिक व्यवसायात रस न वाटणे
परदेशातील वास्तव्याचे आकर्षण
फॅमिली बिझनेसपेक्षा वेगळ्या क्षेत्रातील आवड, कर्तृत्व
पारंपरिक व्यवसायाला नव्या स्पर्धकांची आव्हाने


60 टक्के वाटा
० देशाच्या जीडीपीचा 60 टक्के वाटा फॅमिली बिझनेसचा
०औद्योगिक उत्पादनाचा 90 टक्के वाटा कौटुंबिक व्यवसायांचा
०27 टक्के रोजगार कौटुंबिक व्यवसायांमध्येच
०2011 मध्ये आलेल्या 33 आय.पी.ओ.पैकी 25 कौटुंबिक व्यवसाय
०50 ते एक हजार कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल असणारे 6100 फॅमिली बिझनेस देशात आहेत.
०त्यांची एकत्रित वार्षिक उलाढाल देशाच्या जीडीपीच्या 20 टक्के आहे
०नोंदणीकृत कंपन्यांपैकी 67 टक्के कंपन्या फॅमिली बिझनेस आहेत