आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्षभरात मोबाइल बिल महागणार कॉलचे दर नऊ टक्क्यांनी वाढणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - मोबाइल ग्राहकांनी आता जास्त बिल भरण्याची तयारी करायला हवी, येत्या वर्षभरात कॉलच्या दरात 9 टक्के वाढ करण्याची तयारी दूरसंचार कंपन्यांनी केली आहे. त्यामुळे वाढत्या बिलाचा भार मोबाइल ग्राहकांच्या खिशावर पडणार आहे. मोबाइल कंपन्या आता मोफत एसएमएस आणि टॉक टाइम सवलत हळूहळू कमी करत आहेत. त्याचा थेट परिणाम कॉलचे दर वाढण्यात होणार आहे. एवढेच नव्हे, तर येत्या वर्षभरात मोबाइल कॉलचे दर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मागील दोन वर्षांत मोबाइल कॉलचे दर दुप्पट झाले आहेत. दोन वर्षांपूर्वी एक पैसा प्रतिसेकंद असणारे दर आता वाढून 2 पैसे प्रतिसेकंद असे झाले आहेत. दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात ट्रायने अद्याप या कॉल दरवाढीत हस्तक्षेप केलेला नाही. वाढत्या महागाईचा फटका टेलिकॉम कंपन्यांना बसतो आहे. कंपन्यांच्या खर्चात वाढ झाल्यानेही कॉल दर वाढत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने 122 टेलिकॉम परवाने रद्द केल्यानंतर टेलिकॉम कंपन्यांनी कॉलचे दर वाढवणे सुरू केले आहे.