Home | Business | Gadget | mobile call rate increasing soon, national, business

मोबाईलधारकांनो आताच बोलून घ्या; 'कॉलरेट' लवकरच वाढणार

agency | Update - Jun 19, 2011, 12:34 PM IST

देशातील सर्व मोबाईल सेवा पुरविणाऱया कंपन्या एकत्र येऊन कॉलरेट वाढविण्याचा विचार करत आहेत.

  • mobile call rate increasing soon, national, business

    1_256_13भारतातील तमाम मोबाईलधारकांनो तुमच्यासाठी एक वाईट बातमी आहे. कारण देशातील सर्व मोबाईल सेवा पुरविणाऱया कंपन्या एकत्र येऊन कॉलरेट वाढविण्याचा विचार करत आहेत.
    टाटा डोकोमो या कंपनीने तामिळनाडू सर्कलमध्ये कॉल दरात वाढ केली आहे. ही वाढ पोस्टपेड कनेक्शनसाठी लागू राहणार आहे. प्री-पेडसाठी मात्र कॉल टेरिफमध्ये वाढ केली आहे. कंपनीने आतापर्यंत या दरवाढीबाबत कोणतेही भाष्य केले नाही किंवा कारणही दिले नाही. गेल्या दीड वर्षात कोणत्याही मोबाईल कंपनीने दरवाढ केली नव्हती. मात्र पहिल्यांदा टाटा डोकोमोने वाढ केली आहे. असे सांगितले जात आहे की, इतर कंपन्यांही असे पाऊल उचलण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
    तज्ञांच्या मतांनूसार, मोबाईल सेवा देणाऱया कंपन्यांचा नफा दिवसेंदिवस घटत चालला आहे. त्यामुळे त्यांना कॉलरेट वाढविण्याशिवाय पर्याय नाही. मोबाईल कंपन्या सध्या वैल्यू ऐडेड सर्विसेस यामधून पैसे कमवत आहेत. कॉल दरातून त्यांना विशेष कमाई करता येत नाही. तसेच बाजारात नविन सेवा देणाऱया कंपन्या येण्याची शक्यता नसल्याने तशी स्पर्धा राहणर नाही. त्यामुळे सध्या सेवेत असलेल्या कंपन्या एकत्र येऊन सरसकट वाढ करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे महागाईने कंबरडे मोडलेल्या सामान्यांना पुन्हा एकदा धक्का बसणार आहे.Trending