Home »Business »Industries» Mobile Call Rate May Hike

मोबाईलवर बोलणे आता आणखी महागणार ?

वृत्तसंस्‍था | Feb 10, 2013, 18:43 PM IST

  • मोबाईलवर बोलणे आता आणखी महागणार ?

नवी दिल्‍ली- मोबाईल ग्राहकांना आगामी काळात आणखी एक झटका बसण्‍याची शक्‍यता आहे. सेवा पुरवठादार कंपन्‍या पुन्‍हा एकदा कॉल रेट वाढवण्‍याची शक्‍यता आहे. मार्चमध्‍ये 2 जी स्‍पेक्‍ट्रमच्‍या दुस-या भागाच्‍या लिलावानंतर कंपन्‍या कॉल रेटमध्‍ये 20 टक्‍के वाढ करण्‍याची शक्‍यता आहे.

स्‍पेक्‍ट्रम परवाना मिळवण्‍यासाठी कंपन्‍यांना मोठया प्रमाणात पैसे द्यावे लागतील. त्‍यामुळे हे पैसे वसूल करण्‍यासाठी कंपन्‍या कॉल रेटमध्‍ये वाढ करतील. उल्‍लेखनीय म्‍हणजे मार्च महिन्‍यातच सर्व कंपन्‍या रोमिंग फ्री होणार आहेत. कॉल रेट वाढण्‍यामागे हेही एक कारण असल्‍याचे सांगण्‍यात येते. काही दिवसांपूर्वीच मोबाईल उत्‍पादक कंपन्‍यांनी कॉल रेटमध्‍ये वाढ केली आहे. तसेच व्‍हॅलिडिटीही कमी केली आहे.

Next Article

Recommended