आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mobile Companies Shares Go Up, Spectrum Be Cheap

मोबाइल कंपन्यांचे शेअर्स उसळले, स्पेक्ट्रम स्वस्त झाल्याचा परिणाम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - दूरसंचार नियामक व नियंत्रक प्राधिकरणाने (ट्राय) मोबाइल फोनच्या स्पेक्ट्रमच्या आधार किमतीत मोठी घट केली. त्यामुळे मोबाइल कंपन्यांच्या शेअर्सवर गुंतवणूकदारांच्या उड्या पडल्या.


इन्व्हेंचर ग्रोथ अँड सिक्युरिटीजचे रिसर्च प्रमुख मिलन वाविशी यांनी सांगितले, आगामी स्पेक्ट्रम लिलावासाठीच्या आधारभूत किमतीत ट्रायने 60 टक्क्यांपर्यंत घटीची शिफारस केली आहे. त्यामुळे भारती एअरटेल आणि आयडिया या समभागांची मंगळवारी जोरदार खरेदी केली.


मोबाइल शेअर्सची चाल
कंपनी बंद भाव (रु.) वाढ (टक्के)
भारती एअरटेल 339.10 8.15
आयडिया सेल्युलर 167 5.56
रिलायन्स कम्यु. 141.80 1.65