आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोबाइल कंपन्यांच्या महिलांसाठी ऑफर्स

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - देशातील प्रमुख मोबाइल कंपन्यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आकर्षक ऑफर्स तसेच गिफ्ट देण्याची तयारी केली आहे. अनेक कंपन्या महिला दिनानिमित्त मोफत टॉकटाइम, निगेटिव्ह बॅलन्स असतानाही बोलण्यास मुभा अशा ऑफर्स देत आहेत.

या सर्व ऑफर्समध्ये एका कंपनीची ऑफर्स विशेष आकर्षक आहे. एक टेलिकॉम कंपनी नवे कनेक्शन घेतल्यास महिलांना मोफत पेपर स्प्रे अर्थात मिरची पावडर स्प्रे देत आहे, तर एका कंपनीने देशभरात स्टोअर्स काढून ते महिलाच चालवणार असल्याचे जाहीर केले आहे. एमटीएस ब्रँडअंतर्गत दूरसंचार सेवा देणार्‍या सिस्टमा श्याम टेलिसर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीने वुमन एम्पॉवर्ड प्लॅन सादर करण्याची घोषणा केली आहे. याअंतर्गत एमटीएम प्रीपेड कनेक्शन घेणार्‍या महिलांना मोफत पेपर स्प्रे मिळेल. तसेच विशेष प्लॅन घेणार्‍या महिलांना विशेष कॉलिंग तसेच एसएमएस दर, निगेटिव्ह बॅलन्स असला तरी कॉलिंगची मुभा, सुरक्षेविषयक टिप्स असे लाभ मिळणार आहेत. सुरुवातीच्या काळात ही स्कीम दिल्ली परिसरात राबवण्यात येणार आहे. त्यानंतर ही स्कीम देशभरातील विविध सर्कलमध्ये सुरू करण्यात येणार आहे.

महिला दिनाची तयारी
० नव्या कनेक्शनवर पेपर स्प्रे मोफत
० महिलांद्वारे चालवण्यात येणार एंजल स्टोअर्स
० रिचार्ज केल्यास जास्त टॉकटाइम
० बॅलन्स नसतानाही कॉलिंगची सुविधा
० एक महिना मोफत ब्यूटी टिप्स
० मोफत स्वसंरक्षण वर्गाची संधी