आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोबाइल कंपन्यांचा हँडसेट बाजारातील महसूल घटला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू- फीचर फोन, मल्टिमीडिया फोन्स, एन्टरप्राइज फोन, स्मार्ट फोन्सच्या विक्रीने बाजारात खळबळ माजवलेली असली तरी देशातील मोबाइल हॅँडसेट बाजारपेठेच्या महसुलात मात्र पाच टक्क्यांनी घट झाली आहे. गेल्या वर्षातील 33 हजार 31 कोटी रुपयांचा महसूल 2011-12 वर्षात घसरून 31 हजार 215 कोटी रुपयांवर आला असल्याचे ‘व्हॉइस अ‍ॅँड डेटा’ या मासिकाने केलेल्या एका वार्षिक सर्वेक्षणात दिसून आले आहे.
महसुलातीलही घट फीचर फोन्सची विक्री त्याचप्रमाणे कमी सरासरी विक्री मूल्यामुळे झाली असल्याचे या सर्वेक्षणात म्हटले आहे. व्हॉइस अ‍ॅँड डेटा मासिकाने भातीय तसेच बहुराष्ट्रीय मिळून एकूण 30 मोबाइल हॅँडसेट कंपन्यांचे सर्वेक्षण केले होते.
‘ड्यूएल सिम’ मोबाइल फोन्समध्येदेखील नोकियाने शिरकाव केलेला असला तरी स्मार्टफोन बाजारात मात्र कंपनीला फारसे यश मिळाले नाही. नोकियाने 2011-12 या वर्षात 38.2 टक्क्यांच्या बाजारहिश्शाची नोंद केली.
विंडोज, अँड्रॉइड, बाडा आॅपरेटिंग सिस्टिमवर आधारित चांगल्यात चांगले मोबाइल हॅँडसेट बाजारात आणल्याचा सॅमसंग कंपनीला चांगला फायदा झाला आहे. सॅमसंगने 25.3 टक्के बाजार हिस्सा कमावून दुसºया क्रमांकावर आहे. दक्षिण कोरियातील या कंपनीच्या महसुलात 38 टक्क्यांनी वाढ होऊन तो 7,891 कोटी रुपयांवर गेला आहे. मागील वर्ष संपता संपता मोबाइल बाजारपेठेत मुसंडी मारलेल्या सॅमसंग गॅलक्सी नोट या स्मार्टफोन आणि टॅबलेटचे मिश्रण असलेल्या मोबाइलने बाजारात प्रवेश केल्यापासून प्रत्येक महिन्यात 40 हजार हॅँडसेटची विक्रीची परंपरा कायम राखली आहे. स्वस्त आणि मस्त म्हणून ओळखल्या जाणाºया मायक्रोमॅक्स या भारतीय कंपनीने 1978 कोटी रुपयांचे महसूल मिळवून तिसरे स्थान पटकावले आहे. कंपनीने मोबाइल हॅँडसेट बाजारपेठेत 13 टक्के नकारात्मक वृद्धीची नोंद करीत 6.3 टक्के बाजारहिश्शाची नोंद केली आहे. कार्बन या कंपनीच्या महसुलामध्ये 32 टक्क्यांची वाढ होऊन तो 1 हजार कोटी रुपयांवर गेला आहे.
नोकियाची आघाडी कायम- हॅँडसेट व्यवसायामध्ये 11,925 कोटी रुपयांचा महसूल मिळवून नोकिया ही कंपनी 2011-12 वर्षात अव्वल ठरली आहे, परंतु सॅमसंग, एचटीसी, अ‍ॅपल आणि अन्य कंपन्यांच्या तुलनेत स्मार्टफोन्स आणि मल्टिमीडिया विभागात मात्र कंपनीचा महसूल घटला आहे. नोकिया मोबाइलमधील जवळपास प्रत्येक विभागात आपले स्थान राखून असली तरी अ‍ॅँड्रॉइड इकोसिस्टिममधील अनुपस्थितीमुळे कंपनीच्या कामगिरीला मात्र धक्का बसला आहे.