Home | Business | Gadget | mobile, isi symbol

आता मोबाइलवरही येणार आयएसआय चिन्ह

बिझनेस भास्कर | Update - Apr 12, 2012, 02:26 AM IST

कॉम्प्युटर, प्रिंटर, लॅपटॉपवरही लागणार मोहोर, ग्राहकांना मिळणार आयटी उत्पादन गुणवत्तेची हमी

 • mobile, isi symbol

  नवी दिल्ली- मोबाइल हँडसेट तसेच इतर आयटी उत्पादनांवर आयएसआय चिन्ह अनिवार्य करण्याचा सरकारचा विचार आहे. देशात उत्पादित होणाºया तसेच आयात केल्या जाणाºया आयटी उत्पादनांवर आयएसआय चिन्ह असणे बंधनकारक करण्याची योजना आहे. भारतीय मानक विभागाच्या (बीआयएस) अधिनियम 1986 मध्ये सुधारणा करुन आयटी उत्पादनांवर आयएसआय चिन्ह अनिवार्य करण्याचा प्रस्ताव आहे.
  यासाठी कंपन्यांनाच आपल्या उत्पादनाचे मूल्यांकन करायचे आहे. यामुळे ग्राहकांना उत्तम दर्जाची आयटी उत्पादने मिळणार आहेत. ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाºयाने दिलेल्या माहितीनुसार, मोबाइल हँडसेट तसेच कॉम्प्युटर, प्रिंटर, लॅपटॉप आदी आयटी उत्पादनांसाठी आतापर्यंत कसलेही मानक नव्हते.
  याचा फायदा घेत कंपन्या आपआपसातील स्पर्धेमुळे स्वस्त साहित्य वापरुन कमी दर्जाचे आणि स्वस्त मोबाइल आणि इतर वस्तू बनवतात. त्यामुळे ग्राहकांना मोठे नुकसान सोसावे लागते. ग्राहकांच्या हितासाठी मोबाइल आणि इतर आयटी उत्पादनांसाठी आयएसआय चिन्ह बंधनकारक करण्याची योजना आहे. या अधिकाºयाने सांगितले की, भारतीय मानक ब्युरो, अधिनियम 1986 मध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव असून संसदेच्या चालू अर्थसंकल्पीय अधिवेशानतच बीआयएस अधिनियम 1986 सुधारणा कायदा सादर होण्याची शक्यता आहे. यामुळे आयटी उत्पादनावर आयएसआय चिन्ह बंधनकारक ठरणार आहे. देशातील आयटी कंपन्या तसेच आयातदारांना त्यामुळे बीआयएसकडे कंपनीची नोंदणी करावी लागणार आहे. तसेच आपल्या उत्पादनाचे स्वत: मूल्यांकन करुन त्यावर आयएसआय चिन्ह लावावे लागणार आहे. सुधारीत कायदा लागू झाल्यानंतर एखाद्या कंपनीने त्याचे उल्लंघन केल्यास त्या कंपनीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. यात शिक्षा तसेच दंडाची तरतूद आहे.
  योजना काय आहे- बीआयएस अधिनियम 1986 सुधारणा कायदा सादर होण्याची शक्यता आहे. यामुळे मोबाइल तसेच आयटी उत्पादनावर आयएसआय चिन्ह बंधनकारक ठरणार आहे.
  फायदा काय- कंपन्यांनाच आपल्या उत्पादनाचे मूल्यांकन करायचे आहे. यामुळे ग्राहकांना उत्तम दर्जाची आयटी उत्पादने मिळणार आहेत

Trending