आता मोबाईल खरेदी / आता मोबाईल खरेदी करणे होणार महाग!

May 08,2012 03:03:19 PM IST

जगातील अग्रणी मोबाईल उत्‍पादक कंपनी सॅमसंगसहित नोकिया, एलजी आणि इतर कंपन्‍या लवकरच आपल्‍या हँडसेटच्‍या किंमती वाढवण्‍याची शक्‍यता आहे. सप्‍टेंबरमध्‍ये होणा-या या संभावीत वाढी नंतर मोबाईल खरेदी करणे आणखी महाग होऊ शकते. साधारणपणे ही वाढ पाच टक्‍के ते 30 टक्‍के दरम्‍यान असू शकते.
उल्‍लेखनीय म्‍हणजे सरकारने याचवर्षी सप्‍टेंबरमध्‍ये रेडिएशन नियम लागू करण्‍याची घोषणा दिली आहे. त्‍यामुळे मोबाईल कंपन्‍यांना या नव्‍या नियमांनुसार आपल्‍या हँडसेट तंत्रज्ञानात बदल करावा लागणार आहे. कंपन्‍यांनी असे न केल्‍यास हँडसेट बंद सुद्धा केले जाऊ शकतात. त्‍याचबरोबर कंपन्‍यांना मोठया प्रमाणात आर्थिक दंडही भरावा लागेल. तर ज्‍यांच्‍याकडे रेडिएशन असणारा मोबाईल असेल त्‍यांनाही आपला मो‍बाईल बंद करावा लागेल.
मोबाईल फोनमधील रेडिएशन कमी करण्‍यासाठी वेगळे पैसही द्यावे लागणार आहेत. त्‍यामुळे मोबाईल कंपन्‍यांना चांगलाच फायदा होणार आहे. हे खरेदी करण्‍यासाठी लोकांना दर हजारी 300 रूपये जास्‍त द्यावे लागणार आहेत.X