आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: काय मोबाईल हॅक झालाय ? तर मग हे नक्‍की वाचा !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हॅकिंगचे विश्व आता केवळ संगणकापर्यंतच मर्यादित राहिलेले नाही. हॅकर्सचे नवे सॉफ्ट टार्गेट मोबाइल फोन आहे. यासंदर्भात संयुक्त राष्ट्रानेसुद्धा आपल्या सदस्य देशांना मोबाइलवरील हल्ल्यांच्या नवीन तंत्रज्ञाबाबत सावध केले आहे. त्यांच्या मते, या देशांमध्ये 50 कोटी मोबाइल फोन हॅकर्सच्या निशाण्यावर येऊ शकतात.


कॉम्प्युटर हॅकिंग आणि ई-मेल हॅकिंग यासारख्या समस्या सामान्य लोकांना अद्याप पूर्णपणे माहीत नसतानाच गेल्या काही वर्षांपासून एक नवीन समस्या समोर आली आहे. ती आहे ‘मोबाइल हॅकिंग किंवा फोन हॅकिंग.’ आजकाल हॅकिंग किंवा हॅकर्स सामान्यबाब झाली आहे, पण सामान्य माणसाला याबाबत अद्यापही परिपूर्ण माहिती नाही. त्यामुळे हॅकर्सची मजल त्यांच्या फोनपर्यंत गेली आहे. म्हणजेच आपण ज्या मोबाइलला आपला सर्वात विश्वसनीय साथीदार मानत आलो आहोत. तोसुद्धा यातून सुटलेला नाही. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे सेलफोनमध्ये लावली जाणारी चिप कशा प्रकारे तयार केली जाते. याचा शोध हॅकर्स सहजपणे लावतात. त्यामुळे ते मोबाइल सहजपणे हॅक करू शकतात. जाणकारांच्या मते, हॅक होणारे बहुतांश मोबाइल जीएसएम असतात. यांना हॅक करण्यासाठी हॅकर्सना सहजपणे फोनशी कनेक्ट होणार्‍या काही हार्डवेअरची आवश्यकता असते.

त्यासाठी त्यांना तुमचा फोन दोन ते तीन मिनिटांसाठी हातात घ्यावा लागेल. त्यानंतर थोडीशी इलेक्ट्रॉनिक्सची माहिती असल्यास हॅकर्स तुमचा फोन हॅक करून त्यातील फोन मेमरीची संपूर्ण माहिती मिळवू शकतो. अनेक वेळा तर हॅकर्स तुमची माहिती बदलूही शकतात. धोकादायक बाब म्हणजे आजकालचे हॅकर्स काही सॉफ्टवेअर्सच्या मदतीने आपला फोन हातात न घेताही हॅक करू शकतात आणि तुम्हाला त्याचा पत्ताही लागणार नाही. ब्लू टूथनेसुद्धा मोबाइल हॅक होतो. हॅकर गर्दीच्या ठिकाणी आपल्या लॅपटॉपवर हॅकिंग सॉफ्टवेअर अँक्टिव्हेट करतो. हे सॉफ्टवेअर एका अँटेनाच्या माध्यमातून उपयोगात येणार्‍या जवळच्या ब्लू टूथचे सिग्नल पकडतो. नंतर आपल्या लॅपटॉपच्या मदतीने तो तुमच्या मोबाइलवर उपलब्ध असलेली सर्व माहिती मिळवून त्याचा गैरवापर करू शकतो.