आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Mobile, Tablet Price Hiked; Effect Of Falling Rupee

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोबाइल, टॅब्लेट आणखी महागणार; घसरत्या रूपयाचा परिणाम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - तुम्ही आयात होणारे मोबाइल फोन, अ‍ॅप्स, गॅजेटस आणि इलेक्टॉनिक वस्तू वापरण्याचे शौकीन असाल तर तुमच्या खिशावर दुहेरी भार पडणार आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया घसरल्याने आयात वस्तू महागल्या आहेतच. त्यातच आता आयात उत्पादनांवर सीमा शुल्क लावण्याची तयारी सरकारने केली आहे.


व्यापारी तुटीमुळे आधीच हैराण असलेले सरकार आता इलेक्ट्रानिक वस्तूंसह घरगुती साहित्य, खेळण्या आदी अत्यावश्यक नसणा-या वस्तूंच्या आयातीवर मर्यादा आणण्यासाठी कडक पावले उचलत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही वस्तूंवरील सीमा शुल्क वाढवण्यात येणार आहे. तर काही वस्तूंच्या आयात प्रमाणावर निर्बंध लागणार आहेत. केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनीही तसे संकेत दिले. चालू खात्यातील वित्तीय तूट धोकादायक स्तरावर गेली आहे. यामुळे रुपयाची स्थिती बिघडली आहे.यातून वाचण्यासाठी निर्यातीला चालना देण्यात येणार असून अत्यावश्यक नसणा-या वस्तूंच्या आयातीवर निर्बंध घालण्यात येणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी 31 जुलै रोजी सांगितले होते. त्यानंतर केंद्रीय उत्पादन व सीमा शुल्क मंडळाने अशा वस्तूंची यादी तयार करण्यास सुरुवात केली आहे. या संदर्भातील सर्व बाबी वित्त मंत्रालयात घडत आहेत, असे सांगून मंडळाच्या अधिका-यांनी सविस्तर माहिती देण्यास नकार दिला.


वित्त मंत्रालयातील अधिका-याने सांगितले की, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर सीमा शुल्क लागणार हे निश्चित आहे. गेल्या वर्षीच्या आयातीत या वस्तूंचे प्रमाण 31 अब्ज डॉलरहून जास्त होते. हे प्रमाण सातत्याने वाढत आहे.


पुढचे पाऊल
काही आयात उत्पादनांवर सीमा शुल्क लावण्याची तयारी
काही वस्तूंच्या आयात प्रमाणावर निर्बंध लागणार
घरगुती साहित्यावर सीमा शुल्क वाढवण्याची तयारी
लोखंड आणि स्टीलवरील सीमा शुल्क वाढीचे संकेत


यादी तयार होते आहे..
केंद्रीय उत्पादन व सीमा शुल्क मंडळाने अत्यावश्यक नसणा-या वस्तूंची यादी तयार करण्यास सुरुवात केली आहे. लवकरच याची औपचारिक घोषणा होईल.