बदलत्या तंत्राने मोबाइल / बदलत्या तंत्राने मोबाइल कंपन्यांची दमछाक, नोकिया, ब्लॅकबेरीची स्थिती गंभीर

बिझनेस भास्कर

Apr 10,2012 11:44:20 PM IST

नवी दिल्ली - बदल हा सृष्टीचा नियम आहे. त्यानुसार प्रत्येक क्षेत्रात बदल घडताना दिसून येतो. मात्र, काही क्षेत्रात बदल इतक्या झपाट्याने होतात की होत्याचे नव्हते होऊन जाते. मोबाइल हँडसेट आणि ऑपरेटिंग सिस्टिम (ओएस) हे असेच अत्यंत वेगाने बदलणारे क्षेत्र आहे. गेल्या 15 वर्षात या क्षेत्रात अत्यंत वेगाने मोठे बदल झाले आहेत.
या क्षेत्रात कोणतेही तंत्र दीर्घकाळासाठी टिकून राहिले नाही. याचा फटका मोबाइल क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांना बसला आहे. नोकिया हे याचे उत्तम उदाहरण आहे.
मोबाइल बाजारपेठेत आतापर्यंत अग्रणी असणाºया नोकियाच्या साम्राज्याला स्मार्टफोन आल्यापासून धक्के बसण्यास सुरुवात झाली. अशीच गत ब्लॅकबेरीची झाली आहे. पाच वर्षांपूर्वी ब्लॅकबेरी हा स्मार्टफोनला उत्तम पर्याय ठरेल असे मानत. ब्लॅकबेरी एक जेनेरिक ब्रँड बनला होता. 2005 मधील एका अहवालानुसार ब्लॅकबेरी लाखो लोकांसाठी एक खास मोबाइल बनला होता. कारण तो एक वायरलेस कॉम्प्युटर मानला जायचा. यातून फोनद्वारे ई-मेल करण्याची सुविधा हे त्यावेळी एक प्रमुख आकर्षण होते. मात्र, आधुनिक डिजिटल अर्थव्यवस्थेत होणाºया वेगवान बदलामुळे ब्लॅकबेरीची निर्माती कंपनी रिसर्च इन मोशन (रिम) ची आर्थिक स्थिती नाजूक बनली आहे. या उदाहरणांवरून आता स्मार्टफोनच्या बाबतीत आपली टिमकी वाजवणाºया अ‍ॅप्पलची चलती किती दिवस चालणार असा प्रश्न विचारला जात आहे. रिम कंपनीने प्रमुख अधिकाºयांना काढून टाकण्याबाबत गेल्या आठवड्यातच भाष्य केले आहे. रिमची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. 2003 नंतर प्रथमच रिमचा शेअर घसरून नीचांक पातळीवर आला आहे. रिमच्या समभागात 75 टक्क्यांहून अधिक घट झाली आहे. फोर्ब्समध्ये आलेल्या एका वृत्तानुसार रिमची परिस्थिती अशीच राहिली तर मायक्रोसॉफ्टसारखी कंपनी तिचे अधिग्रहण करण्याची शक्यता आहे.

X
COMMENT