Home | Business | Gadget | mobile & wristwatch, gadgets

घड्याळाची टिक टिक, मोबाइलची ट्रिंग ट्रिंग एक साथ

प्रतिनिधी | Update - Apr 15, 2012, 03:17 AM IST

स्मार्टफोन्स, आयफोन्सने गजबजलेल्या मोबाइल बाजारपेठेला नवा ट्विस्ट देण्यासाठी नेदरलॅँडमधील बर्ग कंपनी एक अनोखी घड्याळ नव्हे मोबाइल भारतीय बाजारपेठेत घेऊन आली आहे.

 • mobile & wristwatch, gadgets

  मुंबई- स्मार्टफोन्स, आयफोन्सने गजबजलेल्या मोबाइल बाजारपेठेला नवा ट्विस्ट देण्यासाठी नेदरलॅँडमधील बर्ग कंपनी एक अनोखी घड्याळ नव्हे मोबाइल भारतीय बाजारपेठेत घेऊन आली आहे. गंमत म्हणजे एकीकडे मनगटावरच्या या घड्याळाची टिक टिक आणि दुसºया बाजूला मोबाइलची ट्रिंग ट्रिंग अशी डबल मजा मोबाइलप्रेमींना लवकरच घ्यायला मिळणार आहे.
  तसे म्हटले तर रिस्टवॉच मोबाइल काही नवीन गोष्ट नाही. एलजी कंपनीने अगोदरच रिस्टवॉच मोबाइल आणण्याची घोषणा केली असून सॅमसंगने अशा प्रकारच्या मोबाइलची प्रतिकृती सादर केली आहे. देशाची विस्तारत असलेली अर्थव्यवस्था, ग्राहकांच्या क्रयशक्तीत झालेली वाढ आणि महत्वाचे म्हणजे अशा प्रकारच्या नावीन्यपूर्ण गॅझेट्ससाठी आसुसलेले मोबाइलप्रेमी ही नेमकी मानसिकता आता परदेशातील कंपन्यांनी देखील हेरली आहे. त्यामुळेच या कंपन्या भारतीय मोबाइल बाजारपेठेच्या प्रेमात पडू लागल्या आहेत.
  बर्ग या कंपनीने पहिल्यांदा उत्तर भारतात आपल्या व्यवसायाचा जम बसवण्याचा विचार केला आहे. त्यानंतर नऊ महिन्यांनी दक्षिण भारतात कंपनी पंख पसरणार आहे. सध्या कंपनीची दिल्ली, गोहाटी, कोलकाता, गुरगाव या ठिकाणी एकूण पाच दुकाने आहेत.
  वर्षभरात आणखी 20 दुकाने सुरू करण्याचा कंपनीचा मानस कंपनीचे जागतिक विक्री संचालक केएन पिटर्स यांनी व्यक्त केला आहेत.
  रिस्टवॉच मोबाइलची वैशिष्ट्ये -
  - ब्ल्यू टूथ कनेक्टिव्हिटी, संभाषणासाठी ब्ल्यू टूथ हॅँडसेट, इंटरनेटवर मोबाइलचे नेमके स्थान समजण्यासाठी एजीपीएस तंत्रज्ञान.
  नेहमीच्या सुविधाही : फोन कॉल , मेसेज, इंटरनेट अ‍ॅक्सेस, कॅमेरा, इमेज व्ह्युअर, फाइल मॅनेजर आॅर्गनायझर.
  कोणते मोबाइल मिळणार : बर्ग 9, बर्ग 10, बर्ग 11, बर्ग 12, बर्ग 13
  किमत : 9 ,000 ते 24, 000 रुपयांपर्यंत

Trending