फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्ग याचा जन्म 14 मे, 1984 रोजी अमेरिकेतील न्युयॉर्क येथे झाला. मार्कने फेसबुकची सुरुवात हॉर्वर्ड विद्यापीठात 4 फेब्रुवारी, 2004 रोजी केली. विद्यार्थ्यांना एकमेकांना जोडण्यासाठी आणि त्यांना ऑनलाइन ओळख कायम ठेवता येईल अशा पध्दतीने फेसबुकचे डिझाइन करण्यात आले होते. या सोशल नेटवर्किंग साइटने मागील दहा वर्षांमध्ये खूप मोठा विस्तार केला आहे. फेसबुक मला जगातील सर्वाधिक श्रीमंतांच्या पंक्तीत नेईल याचा कधीही विचार केला नव्हता, असे मार्क सांगतो.
फेसबुकची जगभरात अनेक ऑफिसेस आहेत. 500 मिलियन कर्मचाऱ्यांना काम करताना आनंद देण्यासाठी या ऑफिसच्या माध्यमातून प्रयत्न केले जातात.
आपण साधी कल्पनाही करु शकणार नाही अशा पध्दतीने फेसबुकचे ऑफिसेस डिझाइन करण्यात आले आहेत. कर्मचारी ऑफिसमध्ये खुल्या हॉलमध्ये बसून आपले काम करतात. भिंत किंवा विभाजक येथे नाहीत. या बरोबरच येथील कर्मचारी तरुणाईतला आहे. तो जास्तीत जास्त 30 वर्षांच्या आतला आहे.
ऑफिसमध्ये गेम खेळण्यासाठी गेम रुम आहे. सर्वोत्कृष्ट कॅफेटेरिया कर्मचाऱ्यांना चविष्ट जेवण पुरवतो. एखादा कर्मचारी काम करून बोर झाल्यास त्याला खेळण्यास मैदानही उपलब्ध आहे.
पुढील स्लाईडवर बघा, आपल्यालाही काम करण्याची इच्छा जागृत होईल असे फेसबुकचे अत्याधुनिक ऑफिसेस...