आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जन धन योजनेमुळे गरीबही आता जोडले जाणार बँकांशी, प्रत्येकाला ‘खाते’वर भर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - आर्थिक सर्वसमावेशकता मोहिमेला एक नवा आयाम देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बॅँक खाती उघडण्यावर भर दिला आहे. विशेष करून गरिबांना बॅँकेत खाते उघडणे सोपे व्हावे यासाठी पंतप्रधानांनी स्वातंत्र्यदिनी केलेल्या भाषणात ‘जन धन योजने’ची घोषणा केली.
गरिबांना बॅँकिंग व्यवस्थेत समाविष्ट करून घेण्याच्या उद्देशाने त्यांना एक लाख रुपयांच्या विमा छत्राबरोबरच डेबिट कार्डही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

गरीब लोक विशेष करून शेतकर्‍यांना सावकारी पाशातून वाचवण्यासाठी त्यांना प्रधानमंत्री जन धन योजनेंतर्गत बॅँकिंग यंत्रणेशी जोडण्याची गरज असल्याचे स्पष्ट करून पंतप्रधान मोदी भाषणात पुढे म्हणाले की, शेतकरी सावकाराकडून कर्ज उचलतात, परंतु त्याची परतफेड करू शकत नाहीत. आपल्या मुलीच्या लग्नासाठी ते सावकाराकडून कर्ज घेतात, परंतु पैशाची परतफेड करता येऊ न शकल्याने त्यांना आत्महत्येवाचून पर्याय राहत नाही. शेवटी या गरीब कुटुंबांचे संरक्षण कोण करणार, असा सवालही त्यांनी या वेळी केला.

लोकांकडे मोबाइल फोन आहेत, पण बॅँक खाते नाही, अशी परिस्थिती आहे, पण या योजनेमुळे नेहमीच्या बँक व्यवहाराचे लाभ त्यांना मिळू शकतील, असेही ते म्हणाले. ऑगस्ट 2018 पर्यंत 7.5 कोटी कुटुंबांत किमान दोघांना तरी बॅँक खाते उपलब्ध करून देण्याचे सरकारचे लक्ष्य आहे.

सुविधा
आधार संलग्न बॅँक खात्यांसाठी 5000 रुपयांची ओव्हरड्राफ्ट सुविधा
एक लाख रुपयांच्या अपघात विमा सुरक्षेसह डेबिट कार्ड
खातेदार आणि बॅँक यांच्या दरम्यान या योजनेसाठी कार्यरत असलेल्या शेवटच्या फळीतील व्यवसाय प्रतिनिधी या दुव्याला महिन्याला किमान पाच हजार रुपये मानधन.
ऑगस्ट 2018 पर्यंत 7.5 कोटी कुटुंबांत किमान दोघांना तरी बॅँक खाते उपलब्ध करून देणार