आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हा आहे जगातील सगळ्यात हलका व छोटा मोबाईल

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हा मोबाईल पाहून तुम्ही हैरान होऊन जाल. हा मोबाईल इतका हलका व छोटा आहे की, मोबाईल हातात घेतल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही.
गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये या मोबाईलची सगळ्यात हलका मोबाईल फोन म्हणून नोंद झाली आहे. हा फोन पहिल्यांदा इस्त्राईलमध्ये सादर केला होता त्यानंतर तो इंग्लडमध्ये दाखल झाला होता. या फोनचे नाव मोडू असे असून तो मोबाईलच्या बॅटरीएवढ्या साईजचा आहे. हा एक म्यूझिक फोन असून, त्यात दोन जीबीची मेमरी आहे. यात ब्लूटूथ, एमपी ३, इंटरनल स्टोरेज यासुविधाही आहेत. ७२.१ मिमी उंच आहे. तर रुंदी ३७.६ मिमी आहे. या फोनची किमत १३० पौंड म्हणजेच १० हजार रुपयेच्या आसपास आहे. मोडू कंपनीने हा मोबाईल बनविला असून ती इस्त्राइलची आहे. ती गॅझेट क्षेत्रात काम करते. सध्या हा फोन इंग्लडमध्ये उपलब्ध आहे.