आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Molls Business Increases In Percentage, Image Research Report

मंदीतही मॉल्समधील विक्रीचा टक्का वाढतोय, इमेज रिसर्चच्या अहवाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - आर्थिक मरगळीमुळे ग्राहकांची क्रयशक्ती कमी झाली असल्याचे एकीकडे म्हटले जाते; परंतु मॉल संस्कृतीची लोकप्रियता मात्र दिवसेंदिवस वाढत असून पुढील तीन वर्षांत मॉडर्न रिटेल विक्रीमध्ये या मॉल्सरूपी शॉपिंग सेंटर्सच्या विक्रीचे प्रमाण 35 टक्क्यांपेक्षा जास्त असेल, असा अंदाज इमेज रिसर्चच्या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.


सध्या मॉल्समध्ये मॉडर्न रिटेलने जवळपास 95 जागा व्यापली असून मॉल्स जसे जसे आकार घेत आहेत त्यानुसार या विक्रीला आणखी बळकटी मिळत नाही. त्यामुळेच 2016 पर्यंत मॉडर्न रिटेलच्या विक्रीमध्ये मॉल्समधील विक्रीची जवळपास 35 टक्क्यांनी भर पडण्याचा अंदाज ‘भारतातील मॉल्स’ या विषयावरील एका अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.


आर्थिक मंदीबद्दल सध्या चिंता व्यक्त करण्यात येत असली तरी सरासरी विक्रीचे प्रमाण वाढते राहण्याचा अंदाज या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे ही विक्री सरासरी 12 टक्क्यांनी वाढून 2016 पर्यंत 1,475 रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.


दरम्यान, ढोबळ 206 दशलक्ष चौरस फूट भाडेपट्टीवरील क्षेत्रफळ आणि 154 दशलक्ष चौरसफूट रिटेल कार्पेट क्षेत्रफळ असलेल्या जवळपास 720 मॉल्सचा एकूण विक्री महसूल 2016 पर्यंत 2,32,400 कोटी रुपयांपर्यंत जाण्याचा अंदाज या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. सध्या कार्यरत असलेल्या 470 मॉल्सचे ढोबळ भाडेपट्टीवरील क्षेत्र 128 दशलक्ष चौरसफूट आहे.


दोन वर्षांत 28 टक्के वाढ
गेल्या दोन वर्षांत मॉल्सच्या संख्येत वार्षिक 28 टक्क्यांनी वाढ झाली असून मॉडर्न रिटेलच्या वृद्धीशी या मॉल्सने बरोबरी साधली असल्याचे अहवालात नमूद केले आहे. सध्या देशभरात जवळपास 250 नवीन मॉल विकासाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर असून 2016 पर्यंत या मॉल्सचो ढोबळ भाडेपट्टी क्षेत्रफळ 206 दशलक्ष चौरस फूट असण्याचा अंदाज आहे.