आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किसान विकासपत्र : बिनधास्त गुंतवणूक, सहज परतावा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- कोणत्याही गुंतवणुकीच्या योजनेत आपण गुंतवलेला पैसा दुप्पट होतो ही संकल्पना प्रत्येक सामान्य गुंतवणूकदाराला आकर्षित करते. किसान विकासपत्रानेही यामुळेच पूर्वी लोकप्रियता मिळवली होती. सरकारच्या ताब्यात पैसे सांभाळण्यासाठी देऊन मुदत संपेपर्यंत बिनधास्त राहण्याच्या मानसिकतेमुळे ही योजना लोकांना अत्यंत भावली होती. आता नवीन काही बदल करून पुन्हा एकदा ही योजना सेवेत दाखल होत आहे. १९८८ मध्ये सुरू झाली तेव्हापासून नोव्हेंबर २०११ मध्ये बंद होईपर्यंत ही योजना प्रचंड लोकप्रिय होती.
६०,००० - कोटी वर्षभरात गुंतवणुकीची अपेक्षा.
२१,६३१ - हजार कोटी. २०१०-११ मधील गुंतवणूक
७,५७५ कोटी. २०११-१२ मध्ये योजना बंद पडेपर्यंत गुंतवणूक.
> एकीकडे किसान विकासपत्रातील गुंतवणुकीवर सरकारने करसवलत देण्याचे टाळले आहे. त्यामुळे करसवलत घेण्यासाठी असलेली गुंतवणुकीचे पर्याय कायम राहतील.
> दुसरीकडे किसान विकासपत्रातील रकमेवर मिळणाऱ्या व्याजावर मात्र टीडीएस कापला जाणार आहे. अर्थात अप्रत्यक्षपणे कुणी काळा पैसा यात गुंतवला तरी सरकार त्यावरील व्याजावर कर वसूल करेल.
करसवलत मिळणार नाही
गुंतवणूक कोण करू शकेल?
करसवलत नाही, मात्र प्राप्त रकमेच्या व्याजावर टीडीएस
एका टपाल कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात स्थानांतरणाची सोय.
किसान विकासपत्रावर बँकांतून कर्जही मिळू शकेल.
प्रारंभी वर्षे महिने ही गुंतवणूक काढता येणार नाही. नंतर पैसे काढले तर ८.७% व्याजदराने रक्कम मिळेल.
वर्षे महिन्यांनी दामदुप्पट
>१ हजार -५ हजार -१० हजार -५० हजार अशा पटीत गुंतवणूक
अशा पटीत करा
गुंतवणूक
प्रारंभी अडीच वर्षांसाठी साधे नंतरच्या काळासाठी चक्रवाढ व्याजदर.
पॅन कार्डची गरज नाही
नव्यानेसुरू करण्यात आलेल्या किसान विकासपत्रात गुंतवणुकीसाठी पॅन नंबरचे बंधन नाही. त्यामुळे सामान्य किंवा कष्टकरी वर्ग, विशेषत: ग्रामीण भागांतील लोक यात सहजपणे गुंतवणूक करू शकतील.
काळ्यापैशाचाही धोका?
किसानविकासपत्रावर कुणाचे नावही असणार नाही. त्यामुळे यात मोठ्या प्रमाणात काळा पैसा गुंतवला जाऊ शकतो, ही भीतीही व्यक्त होत आहे.
आगामी बचत योजना : आगामी काळात केंद्र कुटुंबातील मुली अपंगांसाठी बचतीच्या योजना सुरू करणार आहे. त्याच्या व्याजदराचा निर्णय व्हावयाचा आहे.
पुन्हा गरज का? : मंदीतहा पैसा सरकारच्या हाती खेळेल. देशातील बचतीचा दरही ३६.५ टक्क्यांवरून ३० टक्क्यांच्या खाली आहे.
का बंद होती योजना : २०११मध्ये शामला गोपीनाथ समितीच्या शिफारशीनुसार यूपीए सरकारने ही योजना नोव्हेंबर २०११ मध्ये बंद केली. काळ्या पैशाची गुंतवणूक झाल्याची शंका होती.
> कोणताही भारतीय नागरिक यात पैसे गुंतवू शकेल. स्वत:च्या किंवा लहान मुलांच्या वतीने ही गुंतवणूक करता येईल.
> दोन व्यक्ती एकत्रित गुंतवणूकही करू शकतील.
> संस्थाही विकासपत्रात गुंतवणुकीस पात्र असतील.
> प्रारंभी टपाल कार्यालयांतून, नंतर राष्ट्रीयीकृत बँकांतही किसान विकासपत्र मिळू शकेल.
किसान विकास पत्राचे महत्त्व का?
>गरिबांच्यादृष्टीने अत्यंत सुरक्षित गुंतवणूक.
>चांगला व्याजदर परताव्याची हमी.
>सरकारला विकास कामांसाठी जनतेतून सहज निधी उपलब्ध होतो.