आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Monthly Grocery Shopping Online With Home Delivery

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फक्त क्लिक करा अन् महिन्याचा किराणा घरी आणा!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- महिन्याच्या वाणाचे सामान आणायचे म्हणजे एक मोठे काम असते. महत्त्वाच्या आणावयाच्या वस्तू आठवा, त्याची यादी करा, ती यादी किराणावाल्याकडे टाका किंवा हातात भारंभार पिशव्या घेऊन किराणा सामान घरी घेऊन या. पण ‘एकस्टॉप.कॉम’ या संकेतस्थळाने मात्र किराणा सामान आता थेट ग्राहकाच्या दरातच उपलब्ध करून दिला आहे. ही सेवा सध्या मुंबईत सुरू झालेली असली तरी लवकरच अन्य शहरांमध्ये ही सेवा पोहचवण्याचा कंपनीचा विचार आहे.
एकस्टॉप.कॉम या अनोख्या ऑनलाईन किराणा संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या ‘इ-ग्रॉसरी’ सेवेमुळे ग्राहकांना सहजपणे त्यांच्या दैनंदिन गरजेच्या वस्तू त्यांच्या दरवाजात कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. कंपनी तर्फे ग्राहकांना तीन हजारांहून अधिक उत्पादने, सुपरमार्केट प्रमाणे कॉम्बो पॅकेजेस मध्ये 25 टक्क्यांपर्यंतची सवलत तसेच ग्राहक सेवा आणि सर्वोत्तम वितरण सुविधा उपलब्ध करून देण्याचा दावा केला आहे.
ग्राहकांना जवळच्या किराणा स्टोअर्स प्रमाणेच विशिष्ट ब्रॅँड्स तर उपलब्ध होतीलच शिवाय सुपरमार्केट्सच्या लायनीत उभे राहून किराणामाल खरेदी करण्यासाठी लागणारा मोलाचा वेळ वाचणार आहे. एकस्टॉप मुळे आता ते ऑनलाईन अथवा फोनद्वारे जलद आणि कमी खर्चात किराणा मालाची मागणी करू शकतील.
सध्या या पोर्टलच्या माध्यमातून ग्राहकांना फळे, भाज्यांसह दैनंदिन गरजेच्या वस्तूंची खरेदी जसे किराणा माल ,वैयक्तिक देखभालीच्या वस्तू, घराच्या स्वच्छतेसाठी लागणा-या विविध गोष्टी, बेबी केअर, आरोग्य उत्पादने आणि स्टेशनरी उपलब्ध होणार आहेत. त्याचबरोबर पाळीव प्राण्यांसाठी लागणारी उत्पादने सुध्दा लवकरच या साईटवरून उपलब्ध होऊ शकतील, असे न्यूयॉर्कच्या गोल्डमन साक्सचे माजी व्यवसायिक आणि एकस्टॉपचे सहसंस्थापक सुमंत चोप्रा यांनी सांगितले.
सर्वोत्कृष्ट ग्राहक सेवा - ग्राहकांना सर्वोत्कृष्ट ग्राहक सेवा उपलब्ध होऊन त्यांची ऑर्डर देणे, त्यांच्या खात्याचे व्यवस्थापन, पैसे देण्याची लवचिक पध्दत, डिलिव्हरी ट्रकिंग पध्दत आणि खर्चावर नियंत्रण ठेवणे तसेच खरेदीचा इतिहासही पाहणे शक्य होते.
इंटेलिजंट शॉपिंग - एकस्टॉप ने नाविन्य निर्माण केले असून त्यांत सर्च बाय लिस्ट सारख्या नवीन वैशिष्टयांचा समावेश आहे, (ग्राहक आता एका क्लिकने खरेदी केलेल्या गोष्टींची यादी पाहू शकतील.) एसएमएस इंटिग्रेशन मुळे ग्राहकांना ऑर्डर 30 मिनिटे किंवा 1 तासांवर आली की कळवण्यात येते. तसेच 500 हून अधिक ब्रॅन्ड्सची उत्पादने एमआरपी पेक्षा कमी दरात तसेच चांगल्या ऑफर्ससहीत ग्राहकांकरता काही मोफत वस्तूही देण्यात येतात.


इ-ग्रॉसरी सेवेची वैशिष्ट्ये
सोपा वापर - ग्राहक आता केवळ लॉग ऑन करून उत्पादने व्हर्च्यूअल कार्ट मध्ये ठेऊन पैसे कसे द्यायचे यांची म्हणजेच क्रेडिट/डेबिट कार्ड किंवा कॅश ऑन डिलिव्हरी च्या माध्यमातून खरेदी करू शकतील. त्याबरोबर ते ऑर्डर घेण्यासाठी घरी कधी असतील ती तारीख आणि वेळही नोंदवू शकतात.
वितरण - एकस्टॉप मोफत, वेगवान आणि वेळेत डिलिव्हरी संपूर्ण मुंबईत देण्याची हमी घेते. एक्सप्रेस डिलिव्हरी च्या माध्यमातून 1 ते 4 तासांच्या कालावधीत ही सेवा उपलब्ध असून लवकरच संपूर्ण मुंबईत ही सेवा विस्तारीत करण्यात येणार आहे.