आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

म्युच्युअल फंडांना अनेकांचा टाटा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - विविध प्रकारच्या विलीनीकरण योजना आणि नफारूपी विक्रीचा फटका म्युच्युअल फंड उद्योगाला बसला आहे. परिणामी एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत म्युच्युअल फंडांना जवळपास 20 लाखांपेक्षा जास्त गुंतवणूकदार गमवावे लागले आहेत.
भांडवल बाजार नियंत्रक ‘सेबी’कडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस देशातील 44 म्युच्युअल फंड कंपन्यांकडे एकूण 4.07 कोटी गुंतवणूकदारांची (वैयक्तिक खाती किंवा फोलिओ) नोंद झाली आहे. त्याअगोदरच्या वर्षातल्या याच कालावधीतील 4.28 कोटी गुंतवणूकदारांची संख्या लक्षात घेतली, तर जवळपास 20.72 लाख गुंतवणूकदारांची घट झाली आहे. फोलिओ हा वैयक्तिक गुंतवणुकदारांच्या खात्याला दिलेला क्रमांक असतो. एखाद्या गुंतवणूकदाराकडे अनेक फोलिओ असले, तरी त्याला हा क्रमांक दिलेला असतो.
अन्य कारणांबरोबरच म्युच्युअल फंड उद्योगातील वेगवेगळ्या विलीनीकरण योजना आणि नफारूपी विक्रीमुळे या गुंतवणूकदारांची संख्या घटली असल्याचा अंदाज बाजारातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. यंदाच्या पहिल्या सहामाहीत समभाग योजनांमधील गुंतवणूकदारांची संख्या जवळपास 25 लाखांनी कमी झाली आहे. समभाग निधीमधील गुंतवणूकदारांची संख्या ऑक्टोबरअखेर 3.06 कोटी नोंद झाली आहे.
31 ऑक्टोबरअखेर विविध फंडांनी आणलेल्या एकूण योजना 1,335
समभाग योजना 344
कर्जाशी निगडित योजना891
गुंतवणूकदारांचा घटता आलेख असा
2011 - 12 36 लाख
2012 -13 15 लाख