आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Moto X भारतात उद्या लॉंच होणार, किंमत 23,999

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- मोटोरोला कंपनीचा फ्लॅगशिप फोन Moto X भारतात उद्या (19 मार्च) लॉंच होणार असून प्रारंभिक किंमत 23,999 रुपये ठेवण्यात आली आहे.
Moto X या स्मार्टफोनच्या विक्रीसाठी मोटोरोला कंपनीने Flipkart या वेबसाईटसोबत अधिकृत करार केला आहे. या फोनचे केवळ 16GB स्टोरेज व्हेरायंट भारतात विकण्यात येणार असून wood back व्हेरायंट 25,999 रुपयांना मिळणार आहे. लॉंचच्या वेळी केवळ ब्लॅक आणि व्हाईट व्हर्जनचे स्मार्टफोन उपलब्ध असल्याचे वेबसाईटने सांगितले आहे. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून इतर व्हर्जनचे फोन विकले जातील.
Moto G स्मार्टफोन मध्यरात्री लॉंच करण्यात आला होता. परंतु, Moto X दिवसा लॉंच केला जाणार आहे. या डिव्हाईसला 4.7 इंच HD screen, dual-core processor, 10MP camera आणि 2GB रॅम आहे.
या फोनची सविस्तर वैशिष्टे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...