गुगल मोटो X / गुगल मोटो X झाला लॉन्च, किमतीसह जाणून घ्या फिचर्स

Mar 19,2014 01:54:00 PM IST
गुगल आणि मोटोरोला यांच्या भागीदारीनंतर तयार करण्यात आलेला पहिलाच मोबाइल मोटो X आज भारतात लॉन्च झाला आहे. हा स्मार्टफोन फ्लिपकार्ट या ऑनलाइन स्टोअरवर लॉन्च करण्यात आला आहे. याचप्रकारे काही दिवसांपूर्वी मोटो G लॉन्च करण्यात आला होता.
मोटो X मध्ये कव्हरवर 70 टक्के डिस्काउंट मिळत आहे. पहिल्या 10 यूजर्सना 100 टक्के सूट मिळत आहे. याचबरोबर फिल्पकार्टवर मोटो X, 1000 च्या EMI वर उपलब्ध आहे. याचप्रकारची स्किम कंपनीने मोटो G साठी आणली होती. फिल्पकार्टवर लॉन्च झाल्यानंतर दोन तासांच्या आतच मोटो G आउट ऑफ झाला होता. मोटो X लाही असाच प्रतिसाद मिळेल अशी कंपनीला आशा आहे.
X मध्ये आहे टचलेस कंट्रोल-
मोटोX चे सर्वात लोकप्रिय फिचर म्हणजे याचे टचलेस कंट्रोल. हा स्मार्टफोन व्हाइस कमांड ओळखतो. या स्मार्टफोनला हात न लावता हा मोबाइल वापरता येईल.
मोटो X चे फिचर्स काय आहेत आणि किंमत काय आहे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...
मोटो Xची किंमत फ्लिपकार्टवर अद्याप जाहीर करण्यात आली नसली तरी या स्मार्टफोनची किंमत 23,999 असण्याची शक्यता आहे. यासोबतच लाकडी कव्हरसोबत हा स्मार्टफोन 25999 रुपयांत मिळत आहे. आज लॉन्च झाल्यानंतर हा स्मार्टफोन ब्लॅक आणि व्हाइट रंगात उपलब्ध होणार आहे. मोटो X इतर रंगात प्री- ऑर्डरमध्ये उपलब्ध आहे. फ्लिपकार्टने मोटो X ची किंमत त्यांच्या टि्वटर आकाउंटवर दिली आहे.डिस्प्ले - मोटो X स्मार्टफोनची स्क्रीन 4.7 इंच आहे. याची 4.7 इंचांची स्क्रीन 720*1280 पिक्सल रिझल्यूशन देते. मडियम बजेट स्मार्टफोनमध्ये हे रिझल्यूशन चांगले सिद्ध होऊ शकते. - मोटो X मध्ये 312 पिक्सल प्रती इंच डेन्सिटी मिळते. जास्त पिक्सल डेन्सीटी असल्याने हा स्मार्टफोन उन्हातही चांगला दिसेल. -स्क्रीन प्रोटेक्शनसाठी या स्मार्टफोनमध्ये कॉर्निक गोरिल्ला प्रोटेक्शन लावण्यात आले आहे. - मोटो X मल्टी टचला सपोर्ट करतो.मेमरी मोटो X मध्ये 2 GBची रॅम देण्यात आली आहे. - या स्मार्टफोनमध्ये 16 GB आणि 32 GB मेमरी असणारे दोन स्वतंत्र पर्याय उपलब्ध आहेत. मोटो X मध्ये एक्सटर्नल मेमरी स्लॉट देण्यात आलेले नाही. - सध्या फ्लिपकार्टवर 16 GB मेमरी असणाराच स्मार्टफोन लॉन्च करण्यात येणार आहे. प्रोसेसर या स्मार्टफोनमध्ये 1.7 GHz ड्यूअल कोर प्रोसेसर लावण्यात आले आहे. या स्मार्टफोनचे हेच फिचर्स यूजर्सना निराश करू शकते. लो आणि हाय बजेटमधील सर्वच स्मार्टफोन्समध्ये क्वाड- कोर प्रोसेसर मिळत आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये ग्लोबल लॉन्च झालेल्या या स्मार्टफोनची पॉवर फक्त ड्यूअल कोर होती.कॅमेरा - मोटो X चे कॅमेरा फिचर्स चांगले आहेत. या स्मार्टफोनमध्ये 10 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आहे. ज्यामध्ये 4320 x 2432 पिक्सल असणारे फोटो काढता येतात. - याचबरोबर 1080 पिक्सल असणारे व्हिडीओ 30 सेकंद प्रती सेकंदने मोटो X मध्ये रकॉर्ड करता येतील. - मोटो X मध्ये 2 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. - जिओ टॅगिंग, टच फोकस, पॅनोरामा सोबतच ऑटो फोकस आणि LED प्लॅश X मध्ये उपलब्ध आहे.ऑपरेटिंग सिस्टम मोटो X स्मार्टफोन अॅन्ड्राइड 4.2.2 जेलीबीनवर काम करतो. याची ऑपरेटिंग सिस्टम अॅन्ड्राइड 4.4.2 किटकॅट ऑपरेटिंग सिस्टमध्ये अपग्रेड करता येईल. लॉन्च होणा-या मोट X मध्ये कोणती ऑपरेटिंग सिस्टम असेल या विषयीची माहिती फ्लिपकार्टवर देण्यात आलेली नाही. बॅटरी मोटो X मध्ये 2200 mAh बॅटरी पॉवर आहे. ही बॅटरी 13 तासांचा टॉकटाइम आणि 576 तासांचा स्टँडबाय टाइम देईल असा कंपनीने दावा केला आहे.
X